चंद्रपूर मनपा स्वच्छतादुतांची उल्लेखनीय कामगिरी

चंद्रपूर १० फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील चार वर्षापासून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. विविध प्रभागांमध्ये स्वच्छते विषयक उपक्रम राबविण्यात आले असून त्यास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छतेवरील हे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी 50 स्वच्छतादुतांची नियुक्ती मनपातर्फे करण्यात आली असुन यातील 10 स्वच्छतादूतांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्वच्छतादुतांमध्ये
 श्री श्याम हेडाऊ प्राध्यापक एस.पी.कॉलेज चंद्रपूर –  स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्याकरिता सदैव सामाजिक मार्गदर्शन नागरीकांना करीत आहेत.
श्री श्रीराम पानोरकर समाजसेवक –  हे शहरात विविध ठिकाणी  झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे तसेच दिव्यांग बंधुभागिनींना नेहमी मदत करण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहे.
श्रीमती मनीषा पडगिलवार –  या घरगुती  कचऱ्यापासून उत्पादन बनविण्याचे काम करतात, कचऱ्याचा पुनर्वापर करणे तसेच मानसिकदृष्ट्या अपंग मुलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे त्यांचे योगदान प्रभावशाली ठरते आहे.
स्नेहल खापे – यांची स्वतःची नर्सरी असून त्यामध्ये चंद्रपूर शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या झाडांची ते आपल्या नर्सरीमध्ये स्वतः लागवड करीत आहे व नर्सरी मधुन तयार होणाऱ्या अशा वृक्षांचे शहरात  विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
 श्री कुणाल चन्ने वृक्षप्रेमी – यांनी शहराला ग्रीन सिटी बनविण्याच्या ध्यासाने  प्रत्येकाच्या घरी स्वखर्चाने झाडे पुरविण्याचे काम मागील काही वर्षांपासून करीत आहे. सोबतच स्वतः ते घरोघरी जाऊन वृक्षारोपण करण्याचे कामही करीत आहे.
डॉ.प्रेरणा कोलते – आरोही फौंडेशनच्या माध्यमातून लोकांमध्ये  स्वछतेबद्दल जनजागृती करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी कार्यशाळेत मार्गदर्शन केले असुन स्वच्छता व आरोग्य यांचा सहसंबंध त्यांनी आपल्या मार्गदर्शनातुन त्यांनी लोकांना पटवून दिला आहे.
डॉ. श्रीकांत जोशी – यांनी शहरातील गरजू व्यक्तींना covid-19 संसर्गाच्या काळात स्टीम मशीन व मास्क मोफत वाटले.यामुळे जे व्यक्ती स्टीम मशीन किंवा मास्क घेऊ शकत नव्हते किंवा त्यांना या वस्तू घेणे परवडत नव्हते अशा गरजू व्यक्तींना covid-19 संसर्गाच्या काळात याचा फायदा झाला.
श्रीमती प्रज्ञा बोरगमवार – कार्यशाळा आयोजित करतात ज्यात लोकांना होम कंपोस्टिंगबद्दल मौल्यवान माहिती देण्यात येते. घरच्या घरी कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे,कंपोस्टचे फायदे आणि वापर, ट्रबलशूटिंग टिप्स, वन्यजीवांना तुमच्या कंपोस्टच्या ढिगाऱ्यांमध्ये रस न घेणे आणि अन्नकचरा कचऱ्यापासून दूर ठेवण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या इतर पर्यायांची माहिती देणे यावर त्यानी अनेक  कार्यशाळा घेतल्या.
श्रीमती मंजुषा कासनगोट्टूवार – यांनी घनकचऱ्याचे व्यवस्थापन यासारख्या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करीत असून या कार्यशाळेत ते स्वतः मार्गदर्शन करतात.
प्रेमकुमार उपरे – कार्यशाळा आयोजित करतात ज्यात ते होम कंपोस्टिंगबद्दल मौल्यवान माहिती देतात. वृक्षलागवडीची कार्यशाळाही ते घेतात वृक्षलागवडीची जागा कशी तयार करावी आणि वृक्षलागवडीचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी तसेच मल्चिंग आणि पाणी यांसह झाडांचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाची तंत्रे कशी लावावीत ह्यावर ते कार्यशाळा घेतात.
महेश उचाके – यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या ज्यात शैक्षणिक कार्यशाळेची मौल्यवान माहिती दिली. कोरोनाकाळात साथीपासून दुर कसे राहायचे यावर मार्गदर्शन करत मास्क किटचे गरजू लोकांना वितरण  केले.
मनपातर्फे नेमलेल्या या स्वच्छतादुतांनी विविध उपक्रम राबवितांना स्वतःत सकारात्मक परिवर्तन तर केलेच पण सोबतच सोबतच आपल्या घरी,सभोवतालच्या परिसरात व शहरात स्वच्छता कार्यक्रम राबवून नागरीकांचा उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग सुद्धा मिळवुन घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here