वसंत देशमुख यांच्‍यावर भाजपाने कोणताही अन्‍याय केला नाही

चंद्रपूर: भाजपाचे ज्‍येष्‍ठ नगरसेवक श्री. वसंता देशमुख यांच्‍यावर स्‍थायी समिती सभापती पदासंदर्भात अन्‍याय झाल्‍याच्‍या वल्‍गना श्री. भोला मडावी यांनी पत्रकार परिषद घेवून केल्‍या, मडावी यांचे आरोप पूर्णपणे निराधार असून वसंत देशमुख यांच्‍यावर भारतीय जनता पार्टीने कोणताही अन्‍याय केलेला नाही, असा खुलासा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे तसेच महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केला आहे.

गेली २५ वर्षे भारतीय जनता पार्टीने वसंत देशमुख यांना निवडणूकीत तिकीट दिले आहे व पक्षसंघटनेच्‍या बळावर ते निवडणूकही आले आहे. गटनेता आणि सभागृहनेता अशी दोन पदे त्‍यांच्‍याकडे असल्‍यामुळे एका पदाचा राजीनामा त्‍यांच्‍याकडून घेण्‍यात आला. शिवाय यापूर्वी त्‍यांना उपमहापौर पद सुध्‍दा देण्‍यात आलेले आहे. नगर परिषदेच्‍या कार्यकाळात सुध्‍दा उपाध्‍यक्षपद त्‍यांनी भूषविले आहे. पक्षाने वेळोवेळी त्‍यांचा सन्‍मान केलेला आहे, त्‍यांना पदे बहाल केलेली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कोणताही अन्‍याय झालेला नाही. त्‍याचप्रमाणे या निवडणूकीत राहूल घोटेकर, चंद्रकला सोयाम, पुष्‍पा उराडे, अंकुश सावसाकडे हे अनुसूचित जाती तसेच जमातीचे मनपा सदस्‍य पदाधिकारी झाले आहेत. त्‍यामुळे बहुजन समाजावर अन्‍याय झाला असे म्‍हणणे सुध्‍दा चुकीचे आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमीच सर्व समाजाचा सन्‍मान केलेला आहे. त्‍यामुळे अशा पध्‍दतीचे आरोप हे पूर्णतः चुकीचे आहे. भोला मडावी यांनी केलेले आरोप पुर्णतः निराधार असून ही बाब पूर्णतः पक्षाअंतर्गत आहे. पक्षाअंतर्गत व्‍यवस्‍थेअंतर्गतच निर्णय घेतले जातात. भोला मडावी यांना स्‍पष्‍टीकरण देणे, उत्‍तरे देणे यासाठी आम्‍ही बांधील नाही, असेही भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे तसेच महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी म्‍हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here