
मुंबई:’वॅलेनटाईन डे’ निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असलेबाबची लिंक सोशल मिडियावर व्हायरल होत असून अश्या प्रकारची कोणतीही लिंक प्राप्त झाल्यास त्या लिंकवर क्लिक करू नये. ताज हॉटेल यांचे मार्फत ‘वॅलेनटाईन डे’ निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड देण्यात येत नसल्याचे ताज हॉटेल यांनी स्पष्ट केले आहे.
सायबर पोलिसांनी याबाबत नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला असून वॅलेनटाईन डे निमित्त ऑनलाईन खरेदी करताना योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड संबधी प्राप्त अनोळखी लिंक क्लिक करू नये व त्यामध्ये आपली कोणतीही वैयक्तिक माहिती न देण्याचे आवाहन देखील राज्याच्या सायबर क्राइम पोलीसांनी केले आहे.