
चंद्रपूर: महावितरण कंपनीने विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवुन राज्यातील जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे. राज्यातील संवेदनाहीन महाभकास आघाडीने नागरिकांचा छळ चालविला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिब जनतेला अवाजवी रकमेची बिले पाठवुन आता त्यांचे कनेक्शन कापण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने दि. ५ फेब्रुवारी रोजी महावितरण कंपनीच्या विरोधात हल्ला बोल व ताला ठोक आंदोलन फुकारले आहे. चंद्रपुर पुकारले जिल्हयात सर्व तालुक्यांच्या मुख्यालयी आणि चंद्रपूर महानगरासह सर्व शहरांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सर्व विज ग्राहकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन राज्य सरकारच्या विरोधातील आपला असंतोष प्रकट करावा असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. रेखा कारेकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, जिल्हा भाजपा सरचिटणीस संजय गजपुरे, नामदेव डाहुले, कृष्णा सहारे, राजेश मुन, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम , भाजपा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षा सौ. अंजली घोटेकर, राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले, ब्रिजभुषण पाझारे आदींनी केले आहे.