

चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले शासकीय वसतिगृह तसेच शासकीय निवासी शाळेतील मुलींचे लैंगिक शोषण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून महिला दक्षता समितीची स्थापना करावयाची आहे. सदर समितीमध्ये जिल्हा क्षेत्रीय अधिकारी (अध्यक्ष),
वर्ग-2 /वर्ग-3 महिला अधिकारी /कर्मचारी (सदस्य सचिव) व सदस्य म्हणून जिल्ह्यातील नामाकिंत महिला डॉक्टर, जिल्ह्यातील नामाकिंत महिला वकील, जिल्ह्यातील नामाकिंत निवृत्त महिला मुख्याध्यापिका तसेच उपलब्ध असल्यास माजी विद्यार्थिनी यांचा सदस्य म्हणून समावेश राहणार आहे.
तरी सदर समितीमध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्य करण्यास इच्छुकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दुध डेअरी जवळ, जलनगर वॉर्ड, चंद्रपूर, दुरध्वनी क्रमांक:- 07172-253198 येथे नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधावा, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.