चंद्रपूरच्या हेरिटेज वॉकमध्ये चालला बॉलिवूड गायक शांतनू सुदामे

चंद्रपूर, 31 जानेवारी:11 किमी लांबीच्या गोंङकालीन परकोटच्या 39 बुरुजा पैकी सर्वात सुंदर असलेल्या बुरुजावरून हेरिटेज वाॅकला प्रारंभ झाला. अगदी पहाटेची कोवळी सूर्यकिरणे, किल्याच्या सभोताल असलेल्या रामाला तलाव, या सोनेरी किरणात न्हाऊन निघालेला किल्ला, अशा विहंगम व आल्हाददायक वातावरणात बाॅलिवूङचे सुरेल स्वर ऐकून पर्यटक मंत्रमुग्ध झाले.

दर रविवारी इको-प्रो तर्फे आयोजित हेरिटेज वॉक चंद्रपूर किल्ला पर्यटन आता स्थानिक नागरिकांसह पाहुण्यांनाही आकर्षित करू लागला आहे. आज अगदी भल्या पहाटे आलेल्या नागरिकांना पर्यटनासह सुरेल गाण्यांची मेजवाणी घङली. मुंबई येथील बाॅलिवूङ गायक शांतनू सुदामे यांच्या हेरिटेज वाॅक सहभागाने ऐतिहासिक किल्ला पर्यटनाला सुरेल स्वरांची साथ लाभली.

किल्ला परकोटवरून पर्यटन करताना इको-प्रो चे बंडू धोतरे गाईडच्या भूमिकेत गोंडकालीन इतिहास, गोंडकलीन आख्यायिका सोबतच शहरातील अन्य वास्तूची माहिती, वेगवेगळा कार्यकाळ, युद्ध तसेच किल्ला स्वच्छता ची 900 दिवस माहिती दिली. स्वच्छतेच्या आधी आणि नंतरच्या बदलाची सचित्र माहिती दाखविली. यासोबत इको-प्रो चे ‘आपला वारसा आपणच जपुया’ या उपक्रमाचे महत्व आणि स्थानिक नागरिकांनाच सहभाग कसा महत्वाचा आहे, हे सांगितल.

आज सहभागी झालेल्या पर्यटकांना मोठी पर्वणी होती. मुंबई येथील बॉलीवूडमधील गायक शांतनू सुदामे सहभागी झाला होता.
ज्यांनी “उरी-द सर्जिकल स्ट्राईक” या सिनेमा मध्ये ‘मंजर’ हे गीत गायलेले आहे. या दरम्यान किल्ल्यावर ‘शांतनू’ यांनी काही निवडक हिंदी गाणी सादर केली. चंद्रपूर येथील जंगल व ऐतिहासिक वारसा असलेली अनेक वास्तूने कशी भुरळ पाडली व संवर्धनासाठी सुरू असलेल्या इको-प्रोच्या कार्याने प्रेरित झाल्याची भावना व्यक्त केली.
सोबतच आजच्या हेरिटेज वॉक मध्ये उपस्थित झालेले आयुक्त राजेश मोहिते यांनी शहरातील किल्ला व इतर ऐतिहासिक वास्तू विषयी जाणून शहराचे महत्व असून, स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून सुरू असलेले प्रयत्न अनन्यसाधारण असून, या सुरू असलेल्या कामात पालिकेचा हातभार लावत शहरातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न करण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पुरातत्व विभागाचे वरिष्ठ इंजिनियर कॅम्पेगौडा यांनी इको-प्रो सुरू केलेले स्वच्छता, पर्यटन या कामात भारतीय पुरातत्व विभाग सहभागी असून, सदर हेरिटेज मार्ग मधील असलेल्या अडचणी दूर करून हा पर्यटन मार्ग अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने येत्या काळात प्रयत्न केले जाईल, असे मत व्यक्त केले.आजच्या हेरिटेज वॉक मध्ये अब्दुल जावेद यांच्या नटराज डान्स इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, पालक शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. डेबू सावली वृद्धश्रम चे सुभाष शिंदे, रमेश मुलकलवार व पुरातत्व प्रशांत शिंदे सहभागी झाले होते. हेरिटेज वॉक च्या यशस्वी करण्यास इको-प्रो चे नितीन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, अभय अमृतकर, प्रमोद मलिक, संजय सब्बनवार, जयेश बैनलवार, सौरभ शेटे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here