‘घरकुल मार्ट’च्या माध्यमातून महिलांची ‘घे भरारी’

चंद्रपूर : कोरोना काळात मोठ्या प्रमाणात छोट्या आणि मोठ्या उद्योगांवर परिणाम झाला आहे. संपूर्ण ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. आता करायचे काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर पडला आहे. यातून मार्ग काढत वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील ‘घे भरारी’ महिला ग्रामसंघाने ‘घरकुल मार्ट’ केंद्र स्थापन करून घराला लागणारे साहित्य विक्री केंद्र उभारले आहे. हे महाराष्ट्रातील चौथे केंद्र ठरले आहे. या अभियानाची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पासून झाली आहे. अशा उद्योगाच्या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भर होण्याचे आवाहन आमदार प्रातिभाताई धानोरकर यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने, सभापती पंचायत समिती वरोरा रवींद्र धोपटे, प्रवीण भांडकर , राजू घोटे, सहायक गटविकास अधिकारी वानखेडे, विस्तार अधिकारी चनफने, माधुरी येरमे, ग्रामसंघाचे अध्यक्ष चंद्रकला चाहनकर, सविता जवले, जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भद्रकार, तालुका व्यवस्थापक राजेश बरसगडे यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इंदिरा आवास योजना, शबरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या अनेक योजनेलतील लाभार्थ्यांना घरकामाला लागणारे साहित्य शहरात येऊन खरेदी करावे लागते. त्यामुळे वेळ व पैसे जास्त प्रमाणात लागत असतो. हा नाहक त्रास कमी करण्याकरिता महिला ग्रामसंघ यांनी हे साहित्य विक्रीचे केंद्र उभे केले आहे. यामध्ये गावातच वाजवी दरात साहित्य उपलब्ध होणार आहे.
असाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात ‘घरकुल मार्ट’ केंद्र उभे करून महिलांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. पुढे देखील असा प्रकारे अन्य भागात देखील जाळे पसरविण्याची गरज असून पुढे देखील महिलांना असा लोकहितकारी कामात माझी मदत लागल्यास मी नेहमी आपल्या सेवेत आहे. असे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here