
चंद्रपूर ३० जानेवारी – चंद्रपुर शहर महानगरपालिकेतर्फे नेताजी चौक बाबूपेठ येथे माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. मनपा आयुक्त श्री राजेश मोहिते व उपायुक्त श्री विशाल वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संकल्पनेचे उदघाटन 30 जानेवारी रोजी सकाळी 10,30 वाजता करण्यात आले.
वापरात नसलेली पुस्तके, भांडी, कपडे, चादरी आणि इतर गृहउपयोगी वस्तू एका भिंतीला अडकवायच्या आणि ज्यांना ज्या वस्तूंची गरज असेल, त्यानं त्या वस्तू घरी न्यायच्या, अशी माणुसकीच्या भिंतीमागची संकल्पना आहे.जे तुमच्या जवळ जास्त आहे ते आणून द्या आणि जे तुम्हाला हवे आहे ते घेऊन जा या संकल्पनेतुन माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे.मनपातर्फे स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा असे विविध अभियान राबविले जात आहेत.
माणुसकीची भिंत अंतर्गत कपडे, भांडे, पुस्तके, चप्पल, लहान मुलांचे खेळणे इत्यादी देता तसेच नेता येतील. याप्रसंगी आयुक्तांच्या हस्ते गरजु नागरिकांना कपडे,पुस्तके,खेळणी वितरित करण्यात आल्या, यावेळी प्रशासन अधीकारी श्री नित ,मुख्य स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनूरवार, श्री प्रदीप मडावी, संतोष गरगेलवार,अनिरुद्ध राजूरकर,सौ साक्षी कार्लेकर,सुनील तुंगीडवार ,रमेश कोकुळे, वार्डातील नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते, प्रभागातील गरीब व गरजू व्यक्तींनी याचा लाभ घघेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.