मनपा तर्फे चंद्रपूर शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम   

चंद्रपूर २८ जानेवारी – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत ३१ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शहरात राबविण्यात येणार असुन शहरातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. यासंबंधी मनपास्तरीय समन्वय समितीची बैठक २८ जानेवारी रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत  0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोज रविवार ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देण्यात येणार असून आपल्या जवळच्या बुथवर, अंगणवाडी, शाळा,  बस स्टँड ,रेल्वे स्टेशन,टोलनाके, सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र या सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजता येणार आहे.  .
पल्स पोलिओ मोहीमेअंतर्गत –  १) बाळ नुकतेच जन्मलेले असेल २) या पूर्वी डोस दिला असेल तरीही
३) बाळ आजारी असेल तरीही ( वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावा )
४) (वय वर्ष  ० ते ५ सर्व बालके) या सर्व बालकांना पोलिओची लस देता येणार आहे.

या व्यतिरिक्त प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतरित होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना (भटक्या लोंकाचे पाडे, उस तोडणारे मजुर, बांधकामावरील मजुर, विटभट्टी वरील मजुरांच्या बालकांना) लसीकरण करण्यासाठी पोलिओ लस मिळावी याकरिता १९ मोबाइल टीमची व्यवस्था करण्यात येणार आहे. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, यात्रास्थळे या ठिकाणी सुद्धा २७ ट्रांझिट टीमद्वारा लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर घरोघरी जाऊन लस पाजण्याकरिता एकूण १८९ टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ३१७ बूथ / टीमकरिता प्रत्येकी ५ बुथकरीता १ पर्यवेक्षक याप्रमाणे लसीकरणाच्या दिवशी ६३ पर्यवेक्षक व त्यानंतर लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान घरी भेट देऊन लसीकरण करण्यास ३७ पर्यवेक्षक कार्यरत असणार आहेत.
चंद्रपूर शहरात ० ते ५ वर्षे वयोगटाच्या ३७,००८ बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, आरोग्य सेविका, आशा वर्कर, जिल्हा सामान्य रुग्णालय नर्सिंग स्कूल विद्यार्थी, खाजगी नर्सिंग स्कूल विद्यार्थी, अंगणवाडी सेविका / मदतनीस व स्वयंसेवक असे  एकूण ८०० कर्मचारी व स्वयंसेवक सदर मोहिमेत कार्यरत असणार आहेत तसेच महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार आहे.या मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोज द्यावा व राष्ट्रीय कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान देण्याचे आवाहन  असे आवाहन महापौर सौ.राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
याप्रसंगी मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजया खेरा, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ.नयना उत्तरवार, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. शरयु गावंडे, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ.चंद्रागडे, नरेंद्र जनबंधु, नागेश नीत, शारदा भुक्या, ग्रेस नगरकर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here