
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मराठी पत्रकार भवनाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन प्रसंगी ध्वजारोहण करण्यात आले.पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषद मुंबई चे परिषद प्रतिनिधि मुरलीमनोहर व्यास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी कोरोना वैक्सीन तयार करणारे भारतीय वैज्ञानिकांचा अभिनंदन प्रस्ताव मुरलीमनोहर व्यास यांनी सादर केला.सर्व उपस्थितांनी करतल ध्वनि करून अनुमोदन दिले.जनतेला सत्य बातम्या देणे हा आम्हा पत्रकारांचा धर्म आहे.कोरोना वैक्सीन असो अथवा अन्य कोणत्याही संदर्भात खोट्या अफवा पसरविण्यात येत आहेत.अफवांपासून जनतेला सावधान करून जनहित आणि देशहितासाठी सत्य बातम्या देणे आपले कर्तव्य आहे.
पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषद मुंबई चे परिषद प्रतिनिधि बबन बांगडे,सरचिटणीस सुनील तिवारी,शोभाताई जुनघरे आदिंनी शुभेच्छा संदेश दिले.
कांग्रेस सेवादल चे पदाधिकारी ज्ञानेश्वर जुनघरे यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन केले.या प्रसंगी पत्रकार संघाचे पदाधिकारी नामदेव वासेकर, रवि नागपुरे, विजय लडके,जेष्ठ पत्रकार जयंतराव गुडपेकर, माजी नगरसेवक रमेश जायसवाल,राजू झाड़े उपस्थित होते.हेमंत रुद्रपवार आणि जयंत ने कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.