शहरात वाढत असलेले बाईकस्वारांचे स्टंटबाजी वर नियत्रंण आणण्याची पोलीस अधिक्षकांकडे मागणी

चंद्रपूरः दरवर्षी चंद्रपूर शहरात 26 जानेवारी व 15 आॅगस्ट रोजी युवकांकडुन शहरातील विवीध रस्त्यावर महागडया स्पोर्ट बाईक चालवुन जिवघेणी स्टंटबाजी केली जाते. यामुळे बरेच अपघात होउन अनेक व्यक्ती जख्मी व जिवीतहानीच्या घटना टाळण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याच्या मागणीचे निवेदन इको-प्रो तर्फे पोलीस उपअधिक्षक (मुख्या) चंद्रशेखर देशमुख यांना देण्यात आले. यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे व नितीन रामटेके उपस्थित होते.

शहरात नागपुर रोडवरील चांदा मध्यवर्ती सहकारी बॅक समोरील घटना दुर्दैवी आहे. यात स्टंटबाजी करणारे युवकांकडुन रोडच्या एका बाजुने वाहतुकीचे नियम पाळत, कमी गतीने जाणाऱ्या व्यक्तीला अनियंत्रीत बाईकस्वारांने जोरदार धडक दिली. यात डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने सदर व्यक्ती आज मेहरा हाॅस्पीटल ला भरती आहे. या अपघाताच्या घटनेचे व्हिडीओ सुध्दा व्हायरल झाले आहेत. अशा स्टंट करणारे घटनामध्ये सदर युवकच नाही तर सर्वसामान्य व्यक्ती, वृध्द व लहान मुले कायम धोक्यात असतात, केव्हा मागुन अशी बाईकस्वार धडक देतील याचा काही नेम नाही. शहरात यापुर्वी सुध्दा अशा अनेक घटना मध्ये जिवीतहानी झालेली आहे. यावर वेळीच आळा न घातला गेल्यास अनेकांचा जिव जाण्याची शक्यता आहे. सदर घटनेत दोषी बाईकस्वारांची चैकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.

अशा सर्व घटनाची नोंद रोड अपघात म्हणुन केली जात असल्याने, बाईक स्टंटबाजीमुळे होणाऱ्या घटनाची वेगळी नोंद ठेवणे गरजेचे आहे. शासनाकडुन अश्या बाबीवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यास, कायदयात सुधारणा करण्यास अशा घटनाच्या नोंदी, एफआयआर बाबत वेगळी नोंद ठेवण्याची मागणी सदर निवेदनातुन करण्यात आली आहे, जेणेकरून हा डाटा संकलीत करणे सोपे होईल. तसेच या घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाणे, रस्ते सुरक्षा समीती व महानगरपालीका यांची एक बैठक घेउन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

26 जानेवारीच्या दिवशी रामाळा तलाव परिसरात सकाळपासुनच बाईक स्टंटबाजीला सुरूवात झाली. यावेळी शहर पोलीसांना तक्रार करताच सिटी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री अंभोरे स्वतः रामाळा तलाव येथे येउन बंदोबस्त लावला. रात्री उशीरापर्यत पोलीस बंदोबस्त असल्याने या परिसरात कुठलीच घटना झाली नाही. जवळपास 36 चालान फाडण्यात आले. याकरीता शहर पोलीस विभाग अभिनंदनास पात्र आहे. किमान 15 आॅगष्ट व 26 जानेवारीला याबाबत स्टंटबाजी करीत असलेल्या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. यात रामाळा तलाव, ट्रायस्टार मागील सिटीपीएस ला जाणारा रस्ता, नागपुर रोड, नवीन दाताळा पुल आदी ठिकाण स्टंटबाजी करण्याच्या जागा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here