विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने नगरसेवकांच्या मोहल्ला शाळेचा समारोप

चंद्रपूर: स्मार्टफोन किंवा मोबाईल रिचार्जचा खर्च न झेपणार्‍या अनेक पालकांची मुले कोरोना काळात शिक्षण व शाळेपासून वंचित होते.या विद्यार्थ्यांची शाळा व शिक्षणाशी नाळ जुळून राहावी या हेतूने नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या संकल्पनेतून वडगाव प्रभागातील वडगाव येथे झिरो कॉन्टॅक्ट मोहल्ला स्कूलची सुरुवात करण्यात आली.नगरसेवक देशमुख यांच्यासह जन विकास सेनेचे पदाधिकारी गितेश शेंडे,अक्षय येरगुडे आकाश लोडे,प्रिती पोटदुखे बैरम, मनीषा बोबडे, धनश्री पुनवटकर यांनी विविध विषयाचे शिक्षण देऊन दोन महिने पेक्षा जास्त कालावधीसाठी मोहल्ला शाळेचा उपक्रम राबविला. 27 जानेवारी पासून राज्य शासनाने टप्प्या-टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गणराज्य दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी या शाळेचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमामध्ये खुशी बोरीकर, प्रतीक्षा मासिरकर, हिना काकडे, लावण्या बोरीकर, चैताली नवघरे, तन्वी बल्की, भुषण आंबिलकर, गणेश टेकाम, कंगना गायकवाड, तमन्ना मांदाडे, रागिणी ढोले, योगिनी, भैरवी या विद्यार्थ्यांनी नृत्य,भाषण,गायन,चित्रकला,नाट्य इत्यादी विविध स्पर्धा मध्ये उत्सुर्फ सहभाग घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते भुषण फुसे, घनश्याम येरगुडे, मनपाच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षित मुख्याध्यापिका म्हणून मॅडम अंगणवाडी सेविका बोरीकर मॅडम रूपाताई नवघरे उपस्थित होते यावेळी श्रीराम हनुमान मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी भाविक येरगुडे, वामनराव चौधरी,सुभाष पाऊणकर, दत्तू उपरे व सेवक गोविंदा वैद्य तसेच सफाई कामगार संतोष जाधव व अधिक पेंदोर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी निलेश पाऊणकर यांचे तर्फे मिठाई वाटप करण्यात आले.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल दडमल व आभार प्रदर्शन अक्षय येरगुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता जनविकास सेनेचे मोंटू कातकर,इमदाद शेख,गोलू दखणे,प्रफुल्ल बैरम,कविता अवथनकर,देवराव हटवार,रमा देशमुख यांनी अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here