चंद्रपुरात क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले अभ्यासीकेचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन

चंद्रपूर,26 जानेवारी: स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे गावखेड्यातील मुले केवळ अभ्यासासाठी शहरांकडे येऊ लागली आहेत. यातून
शहरी भागातील अभ्यासीका विद्यार्थ्यांनी फुलल्या आहेत. शहरातील व गावखेड्यातून येणा-या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अडचण जाऊ नये हा उद्देश्य समोर ठेवून कांग्रेसचे विद्यार्थी नेता कुणाल चहारे यांनी पुढाकार घेऊन क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या नावाने अभ्यासीका सुरू केली आहे. पठाणपुरा गेटजवळील जुने डि.एड. कॉलेज जवळ ही अभ्यासिका आहे. या अभ्यासीकेचे उद्घाटन आज 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.पालकमंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले. तसेच ह्या कार्यक्रमाला सर्व सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांतजी चहारे, शहर (जिल्हा) कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, कृषि उत्पन्न बाजार समितिचे सभापति दिनेश चोखारे, विजय अ.चहारे, इत्यादि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन कुणाल चहारे यांनी तर आभार प्रदर्शन केतन दुर्सलवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here