वकिलांना वैद्यकीय विमा योजनेचा लाभ द्या

चंद्रपूर,24 जानेवारी: दिनांक 20 जानेवारीला अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, चंद्रपूर तर्फे श्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय विधी मंत्री,भारत सरकार यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत अधिवक्तांसाठी पारिवारिक वैद्यकीय विमा योजना बद्दल निवेदन देण्यात आले.अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय सम्मेलन मध्ये हा ठराव मंजूर करण्यात आलेला होता की केंद्र सरकारने सर्व अधिवक्तयांसाठी पारिवारिक वैद्यकीय विमा योजना ही लागू करून द्यावे. हीच मागणी अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, चंद्रपूर जिल्हा तर्फे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत केंद्रीय विधी मंत्रींना निवेदन सादर करण्यात आले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष एड.अभय कुल्लरवार यांनी म्हटले कि कोवीड-१९ मुळे अनेक अधिवक्तांच्या व्यासायिक उत्पन्नावर प्रभाव पडले आहे आणि अनेक अधिवक्तांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे, यामुळे कमीत कमी भारत सरकारने वकिलांच्या परिवाराच्या सुरक्षेकरिता पारिवारिक वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात यावी. अधिवक्ता परिषद, चंद्रपूरचे सचिव व सहायक सरकारी अधिवक्ता एड.संदीप नागपुरे यांनी संबोधित करताना म्हटले कि, अधिवक्तांच्या कुटुंबांना केंद्र सरकार मार्फत लाभ मिळत नाही, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे आणि कोरोनाच्या दुष्परिणामा मुळे अधिवक्तांना मोठ्या प्रमाणात संकटांना समोर जावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांना आणि त्यांच्या परिवारांना सुरक्षा प्रदान करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता पारिवारिक वैद्यकीय विमा योजनेची अंमलबावणी होणे आवश्यक आहे. हे निवेदन देण्याकरिता अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष एड.अभय कुल्लरवार, सचिव एड.संदीप नागपुरे, कोषाध्यक्ष एड.अमन मारेकर, एड.अभय पाचपोर, एड.सतीश भोयर, एड.गिरीश मार्लीवार, एड.विनय लिंगे, एड.प्रवीण पिसे, एड.जयप्रकाश पांडे, एड.गोपाल पाटिल, एड.राशिद शेख, एड.विनोद मोड़घरे, एड.व्यंकटेश श्रिरामुला, एड. भूषण वांढरे, एड.अमर बनकर व इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here