‘चंद्रपूर किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक’ उपक्रमाचा शुभारंभ

चंद्रपूर: इको-प्रो च्या 900 दिवस स्वच्छते सोबत किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक सुरू करण्यात आले होते. कोरोना आपदा काळानंतर यंदाच्या मोसमात ‘चंद्रपूर किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचा शुभारंभ आज रविवारी सकाळी 6:30 वाजता करण्यात आला.

आजच्या हेरिटेज वॉक उपक्रमाचा शुभारंभ राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्युत वरखेडकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महानगरपालिका चे अधिकारी, तहसील कार्यालय, शासकीय रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, रोटरी क्लब, हनुमान मंदिर समिती सदस्य आदी शेकडो स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

याप्रसंगी राहुल कर्डीले यांनी या उपक्रम प्रसंगी सांगितले की “बरेचदा आपला समृद्ध वारसा असून विसर पडतो, या हेरिटेज वॉक सारखा उपक्रम वास्तू, माहिती सोबत आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनकरिता आवश्यकता असल्याची भावना निर्माण होईल, आणि वास्तू संवर्धनासाठी महत्वाचे ठरेल व पुढील विकास होईल” तर विद्युत वरखेडकर यांनी सांगितले की, “स्थानिक इतिहास जाणून घेण्याचा दृष्टीने हेरिटेज वॉक उपक्रमास महत्व आहे, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपला ईतिहास जाणून घेत स्थानिक वारसा संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

कोरोना आपदा मुळे इको-प्रो च्या किल्ला स्वच्छता आणि किल्ला पर्यटनात खंड पडलेला होता. हेरिटेज वॉक सुरू करण्यापूर्वी मागील एक महिनापासून नियमित स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ करण्यात आला. किल्ला पर्यटन शुभारंभ करण्यात किल्ल्याचे भिंत, बगड खिडकी, आणि बुरुज फुलांनी सजावट करण्यात आली. सकाळी 6 वाजता पर्यटन सुरू होणार असल्याने अगदी पहाटेपासून किल्ला सजावट सुरू झाली होती. हेरिटेज वॉक मधील सर्व बुरुज खिडक्या सजविण्यात आलेल्या होत्या.

किल्ला पर्यटन दरम्यान इको-चे बंडू धोतरे व अन्य सदस्यांनी गोंडकालीन चंद्रपूरचा इतिहास, स्मारक याबाबत माहिती दिली. यावेळी महानगरपालिका सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, विद्या पाटील, नायब तहसीलदार सचिन पाटील, श्री गादेवार, CISF चे कमांडर मतादिन मीना, मूळ चंद्रपूरचे मुंबई येथील फिल्म मुजिक कंपोजर धिरेंद्र मूलकलवार, रोटरी चे मनीष बोराडे, संतोष तेलंग यांचे सह पदाधिकारी सहभागी झाले होते. शासकीय रक्त पेंढीचे अमोल जिद्दीलवार, श्री वासू आणि अन्य कर्मचारी, हनुमान मंदिर समिती आशिष अलचलवार आणि सदस्य तसेच इको-प्रो चे नितीन रामटेके, धर्मेंद्र लुनावत आदी सदस्य सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here