
चंद्रपूर,२३ जानेवारी:प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठाण, चंद्रपूरच्या वतीने देशविकासासाठी व समाजउत्थानासाठी विदर्भातील व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणा-या संस्थेला किंवा व्यक्तीला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराने गौरवान्वित करण्याचा प्रतिष्ठानाचा मानस वर्तमान पत्रातून जाहीर करण्यात आला होता व इच्छुक व्यक्ती / संस्थांकडून त्यांच्या कार्यासंबंधीच्या कार्याची तपशीलवार माहितीचे प्रस्ताव प्रतिष्ठानाच्या कार्यालयात मागविले होते.
प्रतिष्ठानाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून पात्र ठरलेल्या व निवड झालेल्या इको-प्रो बहुउद्देशिय संस्था, चंद्रपूर या संस्थेला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पूरस्कार २६ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ८.०० वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी चौकातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परीसरात देण्यात येणार आहे.
सदर पुरस्कारात नगदी रूपये १,११,१११/- ( एक लाख अकरा हजार एकशे अकरा ), सन्मानपत्र, विशेष सेवा पुरस्कार सन्मान चिन्ह व शाल-श्रीफळचा समावेश राहील.
तरी या विशेष सेवा पुरस्कार वितरण समारंभाला बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकानी केली आहे.