

चंद्रपूर:येथील महानगर भाजपाच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ताडोबा व्याघ्रप्रकल्पात भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांनां चंद्रपुर जिल्हा व महानगराच्या विकासकामांची माहिती करून देत “सिंहावलोकन”पुस्तिका भेट दिली.पुस्तिकेचे अवलोकन करून राज्यपालांनी आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कौतुक केले.
या शिष्टमंडळात महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,दत्तप्रसन्न महादाणी व शैलेंद्रसिंह बैस यांचा समावेश होता.
सद्या संपूर्ण जगात ताडोबा व्याघ्रप्रकल्प वाघांच्या प्रजननासाठी व दर्शनासाठी प्रसिद्ध आहे.त्यामुळे देशी विदेशी पर्यटकांची रोज येथे मांदियाळी असते.अश्यातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सलग ३ दिवस ताडोबा व्याघ्रप्रकल्प भ्रमण करीत चंद्रपुरचे वैभव अनुभवले.भाजपा च्या शिष्टमंडळाने माजी वित्तमंत्री व विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देणारी “सिंहावलोकन”पुस्तिका भेटस्वरूप दिली.या पुस्तिकेत आ. मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नाने वेळेच्या आत पूर्ण झालेल्या व चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या ऐतिहासिक अनेक महत्वाकांशी प्रकल्पांची माहिती क्यू आर कोडसह करून दिली.क्यू आर कोड स्कॅन करून त्याचे अवलोकन राज्यपालांनी केले.व्हीडिओच्या माध्यमातून सर्व प्रकल्प अनुभवता आल्याने राज्यपालांनी स्तुती सुमने उधळी. सैनिकी शाळा,बांबू अकादमी,बोटॅनिकल गार्डन,ए पी जे कलाम गार्डन,विसापूर येथील जागतिक दर्जाचे स्टेडियम,आगारझरी येथील बटरफ्लाय गार्डन व पुस्तिकेतील, आ मुनगंटीवार यांच्या क्यू.आर. कोड कल्पनेचीही त्यांनी स्तुति केली.यावेळी त्यांनी चंद्रपूरचा इतिहासही जाणून घेतला.