अभियानातून रामचरित्र्य जनसामान्यपर्यंत पोहचवा:अ‍ॅड.रवींद्र भागवत

चंद्रपूर, 16 जानेवारी:श्रीराम हे आमचे आदर्श प्रेरणास्थान आहे. त्यामुळे अयोध्देत त्यांचे भव्य मंदिर व्हावे, ही जनसामान्याची इच्छा असून, ती फलद्रूप करण्यासाठी आम्हाला श्रीरामाचे केवळ मंदिर नाही, तर भव्य असे मंदिर निर्माण करायचे आहे. हे मंदिर जनसामान्यांच्या योगदातून झाले पाहिजे यासाठी हे अभियान असून, या अभियानाच्या माध्यमातून रामाचे चरित्र्य जनसामान्यापर्यंत पोहचवा, असे आवाहन अ‍ॅड. रवींद्र भागवत यांनी केले.

श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र भव्य श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण तथा गृह संपर्क महाअभियानाच्या आरंभ चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवार, 15 जानेवारी रोजी येथील मूल मार्गावरील विवेक नगर परिसरातील श्री राम मंदिर येथे करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भागवताचार्य मनिष महाराज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, धर्म जागरणचे प्रांत संयोजक महेंद्र रायचुरा, रा. स्वं. संघाचे जिल्हा कार्यवाह शैलेश पर्वते प्रभृती उपस्थित होते.

अ‍ॅड. भागवत पुढे म्हणाले, आमचे प्रेरणास्त्रोत असलेल्या श्रीराम यांचे जन्मस्थान अतिक्रमींच्या हाती होते. तेथे राम मंदिराची पूर्नस्थापना झाली पाहिजे या राष्ट्रभावनेतून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेकांचे बळी गेले. मात्र, श्रीरामाच्या चारित्र्यातून प्रेरणा प्राप्त करून कारसेवकांनी हे आंदोलन यशस्वी केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा अयोध्दा ही श्रीरामांची जन्मभूमी आहे हे मान्य केले. आता जनसामान्यांच्या योगदानातून मंदिर निर्माणचे कार्य करायचे आहे. मात्र, सामान्य जनता जागृत होत नाही, तोवर कुठलेही धर्म कार्य सिध्दीस जात नाही. रामाचे कार्य हे धर्म कार्य असून, यासाठी प्रत्येेकाच्या समर्पणाची आवश्यकता आहे. यासाठी मंदिर निर्माण निधी समर्पण तथा गृह संपर्क महाअभियाना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जिल्ह्यातून जास्तीत जास्त निधी कसा गोळा होईल यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

मनिष महाराज यांनी, निधी समर्पण हे व्यक्तीगत अभियान न रहता जनसंपर्क अभियान झाले पाहिजे. हे अभियान मंदिर निर्माणचे नसून, भारत निर्माण करण्याचे अभियान आहे, या भावनाने सर्वांनी प्रयत्न करावे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्यातील श्रीरामाला जागृत करून योगदान देईल, तेव्हाच सेवा सार्थक होईल, असे प्रतिपादन केले.

यावेळी अ‍ॅड. रवींद्र भागवत  यांनी 1 लाख 10 हजार 111 रुपये, संदीप पोशट्टीवार यांनी 1 लाख रुपये, रामकिशोर सारडा यांनी 1 लाख 1 रुपये, तर अशोक हासानी व परिवार यांच्यातर्फे 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी समर्पण धनादेश मनिष महाराज यांच्या सुपूर्द केला. या कार्यक्रमाची सुरूवात ‘अवधपुरी में फिरसे मंदिर…जय जय जय श्रीराम’ या गिताने झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश पर्वते यांनी केले. याप्रसंगी प्रांत समग्र ग्रामविकास प्रमुख भाईजी मेहर, विहिंप कार्याध्यक्ष विनोद उपाध्याय, जिल्हा मंत्री विजय एंगलवार, अधिवक्ता परिषदेचे अभय कल्लुरवार, रा. स्वं. संघाचे विभाग सहकार्यवाह संजय दानेकर, राष्ट्रसेविका समितीच्या जिल्हा कार्यवाहिका अंजली हिरूरकर आदी उपस्थित होते. महाआरती व प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here