नायलॉन मांज्यात अडकलेल्या पक्ष्यास इको-प्रो व स्थानिक नागरिकांनी दिले जीवदान

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरात हवेतून उडत जाणाऱ्या पक्षी नायलॉन मांज्यात अडकल्याने खाली पडला, छतावर पतंग उडविणारे मुलांना दिसताच सदर पक्षीला पकडण्यात आले. त्यांच्या दोन्ही पंखात मांजा अडकल्याने जखमी झाला असल्याने त्याची हालचाल कमी होती. मोठा पक्षी असल्याने स्थानिक नागरिकांनी पाहण्यास एकच गर्दी केली होती.

याची माहिती इको-प्रो ला देण्यात आल्यानंतर इको-प्रो पक्षी संरक्षण विभाग चे सदस्यांनी त्यास सदर परिसरात जाऊन बिनबा गेट परिसरातील राजू येले यांचे मुळे पक्षी घरी छतावर सुरक्षित ठेवण्यात आले होते. त्यास ताब्यात घेऊन त्याच्या पंखातून अडकलेला मांजा काढण्यात आला, त्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यास आज सकाळी इरई नदीच्या पुलावरून सोडण्यात आले. यापूर्वी मागील काही दिवसात पक्ष्यांना जीवदान देण्यात आले आहे. इको-प्रो चे सचिन धोतरे, नितीन रामटेके, प्रमोद मलिक, कपिल चौधरी, स्वप्नील रागीट, अमोल उत्तरवार यांचेकडून रेस्क्यू व निसर्गमुक्त करण्याचे कार्य सुरू आहे.

मोठा पाणकावळा पक्षी
सदर नायलॉन मांजा मध्ये अडकलेला हा पक्षी ‘मोठा पाणकावळा’ असून, पानथळीच्या जागी आढळून येतो. नदी, तलाव त्याचे आढळस्थान असून एखाद्या झाडाच्या ओडक्यावर, दगडावर आपली पंख फैलावून बसलेला दिसतो.

सध्या पतंग उत्सव सुरू असून, मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा विक्री केला जात असून, त्याचा वापर युवकांकडून केला जात आहे. यामुळे अनेक व्यक्तींना जीव गमवावे लागले आहे, पशु-पक्षीना धोकादायक आहे. बंदी असताना सुद्धा याचा वापर अनेकांच्या जीवावर उठला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here