

चंद्रपूर:भारतीय जनता पक्षात घराणेशाही नाही.या पक्षात कुटुंबव्यवस्थेला स्थान नाही,पण हा पक्ष एक परिवार आहे.संघटनेमध्ये पारिवारिक भावना असली की पक्ष मोठा होतो.सामान्य माणसांत विश्वास निर्माण होईल असे कार्य करा.पदं फक्त मिरविण्यासाठी नाही तर,जनतेच्या सेवेसाठी असतात.असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री,विधिमंडळ लोकलेखा समिती(म.रा)अध्यक्ष,आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून केले.
ते भारतीय जनता पार्टी,महानगर चंद्रपुर तर्फे एन.डी.हॉटेल सभागृहात सोमवार(११ जानेवारी)ला आयोजित ‘भाजपा महानगर कार्यकारिणी’च्या पद्ग्रहण सोहळ्यात बोलत होते.यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंद्रपुर भाजपा महानगर प्रभारी खा.अशोक नेते व प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची उपस्थिती होती.
आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले,स्पर्धा स्वतःची स्वतःशि करायची असते.जय- पराजय हे निवडणुकीचे बाय प्रॉडक्ट् आहेत.निवडणूक जिंकणे हेच आमचे अंतिम लक्ष नाही,तर शेवटच्या माणसांपर्यंत पोहचून त्यांचे हृदय जिंकणे हे अंतिम लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.मी मोठा नाही,पद माझ्यापेक्षा मोठे आहे,ही भूमिका सर्वांनी ठेवली तर भाजपाला कुणीही हरवू शकत नाही. जो दुसऱ्याची नकल करतो तो जास्त काळ टिकत नाही, म्हणून आपल्यातील गुण विकसित करा.सेवा,संघर्ष,संघटन,संवाद आणि विकास ही पंचसूत्री अंगिकारली तरच संघटन मोठे व मजबूत होऊ शकते.निस्वार्थ भावनेने काम करा.संघटनेतील माझा प्रत्येक कार्यकर्ता कोहिनुर हिऱ्या सारखा आहे,असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना हंसराज अहीर म्हणाले,भाजपा देशातील राजकारणात मोठा पक्ष आहे.सक्रिय होण्यासाठी पदांची गरज नाही.जे पद मिळाले त्या पदाची प्रतिष्ठा वाढविली तरच पक्ष मोठा होतो.हे पद पक्षाने दिले आहे.पक्षात लोकशाही असावी असेही ते म्हणाले.यावेळी खा अशोक नेते यांनी महानगर भाजपा टीम चे कौतुक करीत,नियोजन व संघटन बरोबर असले की विजय निश्चित मिळतो असे सांगितले.यावेळी महापौर राखी कंचर्लावार,जेष्ठनेते प्रमोद कडू यांनी समयोचित मार्गदर्शन केले.या प्रसंगी महानगर भाजपा, महिला मोर्चा,भाजयुमो व विविध प्रकोष्ठच्या किमान १४५ पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,भाजपा जेष्ठनेते विजय राऊत,प्रमोद कडू,महामंत्री राजेंद्र गांधी,सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,माध्यम संपर्क प्रमुख प्रशांत विघ्नेश्वर,महिला मोर्चा जिल्हाअध्यक्ष अंजली घोटेकर,महामंत्री प्रज्ञा बोरगमवार,शिला चव्हाण,सपना नामपल्लीवार,उपाध्यक्ष मंजुश्री कासंगोट्टूवार,भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर,महामंत्री प्रज्वलंतकडू,सुनील डोंगरे,मंडळ प्रमुख संदीप आगलावे,सचिन कोतपल्लीवर,विठ्ठलराव डुकरे,दिनकर सोमलकर,रवी लोणकर,नगरसेवक संजय कंचर्लावार,सुनील फुलझेले,रवी आसवानी,संदीप आवारी,सविता कांबळे,शीतल कुलमेथे,ऍड सुरेश तालेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ मंगेश गुलवाडे यांनी तर संचालन प्रज्ञा बोरगमवार,मंजुश्री कासंगोट्टूवार व नासिर खान यांनी संयुक्तपणे केले. केले.अंजली घोटेकर यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी छबु वैरागडे,प्रमोद क्षीरसागर,रवी जोगी,रामकुमार अकापेलीवार आदींनी परिश्रम घेतले.