59 व्‍या हिन्‍दी राज्‍य नाटय स्‍पर्धेत विदर्भाची बाजी

चंद्रपूर:59 व्‍या महाराष्‍ट्र राज्‍य हिन्‍दी राज्‍य नाटय स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीत डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर या संस्‍थेच्‍या अजय धवने, आशिष अम्‍बाडे निर्मीत ‘हॅलो राधा मैं रेहाना’ या नाटकाने निर्मीतीच्‍या प्रथम पारितोषीकासह 8 पारितोषीके पटकावित राज्‍यात अव्‍वल ठरण्‍याचा बहुमान प्राप्‍त केला आहे. या नाटकाला निर्मीतीचे प्रथम पारितोषीक प्राप्‍त झाले असून सर्वोत्‍कृष्‍ट दिग्‍दर्शनाचे प्रथम पारितोषीक डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांना जाहीर झाले आहे.

सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री रौप्‍यपदक नूतन धवने यांना तर अभिनय गुणवत्‍ता पुरस्‍कार रोहिणी उईके यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्‍कृष्‍ट प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषीक हेमंत गुहे यांना तर सर्वोत्‍कृष्‍ट नेपथ्‍याचे प्रथम पारितोषीक पंकज नवघरे, तेजराज चिकटवार यांना जाहीर झाले आहे. सर्वोत्‍कृष्‍ट रंगभूषेचे प्रथम पारितोषीक मेघना शिंगरू, बबीता उईके यांना जाहीर झाले असून सर्वोत्‍कृष्‍ट नाटय लेखनाचे प्रथम पारितोषीक या नाटकाचे लेखक निरंजन मार्कंडेयवार यांना जाहीर झाले आहे. या नाटकाने राज्‍यात प्रथम येत चंद्रपूरची यशोपताका पुन्‍हा एकदा राज्‍यात डौलाने फडकविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here