योजनेचा लाभ घेऊन पथविक्रेत्यांनी आत्मनिर्भर व्हावे – महापौर राखी संजय कंचर्लावार

चंद्रपूर ११ जानेवारी – कोरोना आघातात जेव्हा सर्वच उदयॊग, व्यवसाय संकटात होते, तेव्हा पथविक्रेता या सर्वात गरीब घटकाला दिलासा देण्याचे काम पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेने केले आहे. आज या २०६ पथविक्रेत्यांना धनादेश देतांना मला अतिशय आनंद होत आहे. पथविक्रेत्यांनी याचा लाभ उचलून आपल्या व्यवसायाचे योग्य नियोजन करावे व आत्मनिर्भर होण्याचे आवाहन महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रम ११ डिसेंबर रोजी ज्युबली हायस्कूल समोरील बी.पी.एल. कार्यालय येथे पार पडला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना महापालिका क्षेत्रात अधिक गतीने राबवुन चंद्रपूर महानगरपालिका राज्यात आघाडीवर ठेवण्याचा चंद्रपूर मनपा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या योजनेतून महानगरपालिका क्षेत्रातील एकही पथविक्रेता वंचित राहू नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल असे महापौर यांनी सांगितले.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना प्रत्येकी 10,000/- रुपये देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत चंद्रपूर शहरात ३ हजार ९०० पथविक्रेत्यांनी अर्ज केले असून यापैकी आतापर्यंत १ हजार ११० पथविक्रेत्यांच्या प्रकरणांना मंजुरी मिळून यापैकी ७०३ लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. शहरातील बँकांनी १११० जणांचे कर्ज मंजूर केले आहे.
अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक असलेले पथविक्रेते शहरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता  करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे. या उद्दिष्टांच्या आधारे पथविक्रेत्यांना औपचारिकरित्या अर्थसहाय्य करण्यास सदर योजना मदत करेल आणि या घटकाला त्यांची आर्थिक घडी बसविण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करेल असे आयुक्त राजेश मोहिते याप्रसंगी म्हणाले.
याप्रसंगी उत्कृष्ट योगदान व सहकार्याबद्दल जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक श्री. शंभुनाथ झा यांचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर सौ. अंजली घोटेकर व शंभुनाथ झा यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सर्व बँकेच्या विद्यमानाने शहरी भागात व्यवसाय करणाऱ्या सर्व पद – पथ विक्रेत्यांना ” मै भी डिजिटल ”  ( मी पण डिजिटल ) मोहिमेअंतर्गत सर्व बँकेच्या सर्व पीएम स्वनिधी कर्जधारकांसाठी डिजिटल मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यात शासननिर्देशाप्रमाणे ” मै भी डिजिटल ”  ( मी पण डिजिटल )  ही ऑप डाउनलोड कशी करावी तसेच त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी महापौर सौ.राखी कंचर्लावार, आयुक्त श्री. राजेश मोहिते, सभागृह नेता श्री. वसंता देशमुख, विरोधी पक्ष नेते श्री. सुरेश महाकुळकर, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, उपायुक्त श्री. संतोष कंधेवार, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक श्री. शंभुनाथ झा, समाजकल्याण अधिकारी श्री. सचिन माकोडे  व शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे प्रबंधक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुषमा करमरकर, प्रास्ताविक रोशनी तपासे तसेच श्री बांते, श्री. मेश्राम, श्री. खडसे, सौ. लोणारे, सौ पाटील, सौ. मुन, श्री. खडसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सदर उपक्रमात बँकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभत आहे. १० जानेवारी पर्यंत ७०१ धनादेश बँकांमार्फत वितरीत करण्यात आले असुन आज झालेल्या कार्यक्रमात २०६ असे एकूण ९०७ लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले आहेत.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बँक – प्रबंधक – देण्यात आलेले धनादेश.      
जिल्हा अग्रणी बँक – श्री. शंभुनाथ झा १०, बँक ऑफ इंडीया जटपुरा शाखा – चंद्रकांत दांडेकर – ५ , बँक ऑफ इंडीया बाबुपेठ शाखा – डी. डी. नंदनवार – २०, बँक ऑफ इंडीया ऊर्जानगर – ७, भारतीय स्टेट बँक – अनुप दलाल – ६७, अलाहाबाद बँक – कुमार सौरभ प्रियादशे – १६, बँक ऑफ महाराष्ट्र्र मेन – चेतन काळे – १६, बँक ऑफ महाराष्ट्र्र वडगाव -आलोक चौधरी – ३ , सेंट्रल बँक ऑफ इंडिया – सुनील शहारे – १०, युको बँक मेन – सिंग – १०, युनियन बँक ऑफ इंडिया – एस आर वाकडे – १०, पंजाब नॅशनल – पवन वर्मा – २१, इंडियन ओव्हरसीज बँक – नितीन मडामे – ११ = एकूण २०६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here