
वरोरा : अलीकडे सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने जवळपास सर्वच रुग्णालयात रक्ताची कमतरता भासत आहे.यामुळे रक्तदान शिबीर घेऊन वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्या नुसार आज शनिवार दि.९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता अभ्यंकर वॉर्ड वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर च्या चमूच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांकरिता रुग्ण वाहक खुर्चीचे लोकार्पण,अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल राजा यांच्या नेतृत्वात युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजनदेखील काँग्रेसतर्फे करण्यात आले होते.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, तृतीयपंथी समाजाचे प्रश्न, मायनिंग शाखेत मुलींना प्रवेश मिळवून देण्याच्या प्रश्न ,असे एक ना अनेक समाजाभिमुख प्रश्न सोडविण्याकरिता आमदार प्रतिभा धानोरकर या नेहमी आग्रही राहिल्या आहे. धानोरकर यांनी महिलांचे अनेक प्रश्न विधिमंडळात लावून धरल्याने अल्पावधीतच महिलांच्या प्रश्नासंबंधी जागरूक आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊन लोकप्रियता वाढत आहे. हे आज त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांच्या संख्येतील महिलांच्या मोठ्या संख्येवरून सुद्धा दिसून आले. आज आमदार धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्त वरोरा व भद्रावती तालुक्यामध्ये गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप, रुग्णालयात फळ आणि शॉल वाटप करण्यात आले .
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष शुभम चिमूरकर यांच्या नेतृत्वात , डॉ ए एम शेख , कृउबास सभापती राजू चिकटे, सुनील वरखडे ,प्रमोद मगरे, कृउबास माजी सभापती तथा विद्यमान संचालक विशाल बदखल, संचालक हरीश जाधव , काँग्रेसचे वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले,तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर,मनोहर स्वामी , जिल्हा परिषद सदस्य सुनंदा जीवतोडे, पंचायत समिती उप सभापती संजीवनी भोयर, पंचायत समिती सभापती धोपटे,नगरसेवक गजानन मेश्राम,नगरसेवक राजू महाजन, भद्रावती पं.स.चे माजी उपसभापती भोजराज झाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भद्रावती तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर,भद्रावती बाजार समितीचे संचालक प्रदीप घागी , उपजिल्हा रुग्णालय आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे, प्रवीण मगरे, प्रवीण काकडे,बसंत सिंघ, अभिजीत कुड़े ,योगेश लोहकरे,राहुल देवडे, मनोज गुप्ता, सचिन घाटे ,राजिक शेख ,विक्की वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.