आ. किशोर जोरगेवार यांच्या आंदोलनाला यश, एका महिण्यात वेकोली करणार पदभरती

चंद्रपूर:वेकोलीत पदभरती करुन रिक्त जागा भरण्यात यावा, व या भरती प्रक्रियेत विदर्भातील युवकांना प्राधान्य देण्यात यावे या मागणी करीता आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेकोलीच्या नागपूर येथील सि.एम.डी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची दखल घेण्यात आली असून एका महिण्यात वेकोली अंतर्गत येणा-या विविध विभागातील रिक्त जागांची पदभरती करण्याचे आश्वासन वेकोलीच्या नागपूर सि.एम.डी कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे. आ. किशोर जोरगेवार यांच्यासह सि.एम.डी कार्यालयातील अधिका-यांनी बैठक घेतली असून या बैठकीत हे आश्वासन देण्यात आले. यावेळी नागपूर विभागाचे सि.एम.डी मनोज कुमार यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरात वेकोलीचे जाळे पसरले आहे. याचा मोठा दुष्परीणाम प्रदुषनरुपाने चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असले येथील युवकांना येथे रोजगार मिळत नाही. त्यामूळे वेकोलीत रिक्त असलेली पदे भरण्यात यावी या मागणी करीता ५ जाणेवारीला आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नागपूर येथील वेकोलीच्या सि.एम.डि कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांसह युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन नागपूर विभागाचे सि.एम.डी यांना देण्यात आले होते. यावर चर्चा करण्यासाठी सि.एम.डी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मोर्चा दरम्याण केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. एका महिण्याच्या आत वेकोलीतर्फे विविध विभागात रिक्त जागांची पदभरती करण्याचे आश्वासन या बैठकीत सि.एम.डी मनोज कुमार यांनी आ. जोरगेवार यांना दिले आहे. यावेळी वेकोली अंतर्गत येणा-या विविध विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली आहे. सि.एम.डी मनोज कुमार यांच्या आश्वासना नंतर आता वेकोलीत रोजगार मिळण्याची आशा सोडल्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या अगोदरही आमदार किशोर जोरगेवार यांच्या आंदोलना नंतर वेकोलीच्या वतीने ३३३ माईनिंक सरदार पदाच्या जागा भरण्यात आल्या होत्या. आता पून्हा एकदा त्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले असून त्यांच्या आक्रमक पवित्र्या समोर वेकोली प्रशासन नमते झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here