लसीकरण मोहिमेत सर्वांनी सहकार्य करावे – महापौर राखी कंचर्लावार

चंद्रपूर ,९ डिसेंबर – मागील कित्येक दिवस आपण सर्वांनी कोरोना साथरोगाच्या दहशतीत काढले आहेत,यावर उपायाची आपण वाट पाहत होतो, मात्र आता कोरोनाची लस मिळणार आहे. याची संपूर्ण पूर्वतयारी मनपा प्रशासनाने केलेली आहे. लस पुर्णपणे सुरक्षीत असून या बाबत कुठलीही भिती नागरीकांनी मनात बाळगू नये व कुठल्याही अफवांना बळी न पडता लसीकरण मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन मा महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी केले.
कोविड 19 लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून  ड्राय-रन (रंगीत तालीम)  कृती कार्यक्रम 8/1/2021 रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर अंतर्गत रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा येथे मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार व आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्या अंतर्गत कोविड प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष व्यवस्था करण्यात आली होती तसेच मार्गदर्शक सूचनेनुसार 5 अधिकाऱ्यांची टीम कार्यरत ठेऊन AEFI किट, ऑनलाईन रेजिस्ट्रेशन वेरिफिकेशन व्यवस्था व रुग्णवाहिका सह इतर सर्व सोईसुविधा उपलब्ध ठेवण्यात आलेल्या होत्या. हात सॅनिटाईज करणे, तापमान मोजणे, यादीत नाव तपासणे, आयडी तपासणे, कोवीनअँप वर नाव तपासून प्रत्यक्ष लसीकरण नंतर अर्धा तास निरीक्षण प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. लसीकरणांतर्गत २५ लोकांवर लस टोचण्याची रंगीत तालीम घेण्यात आली. लसीकरणानंतर अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबून त्यांचे निरीक्षण करण्यात आले. लसीकरण मोहिमेत शहरातील प्रत्येक माणसापर्यंत लस पोहोचवायची दृष्टीने मायक्रो प्लानिंग ड्राय-रन दरम्यान करण्यात आले होते.
लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला असुन याअंतर्गत प्रथम आरोग्य अधिकारी ,फ्रंट लाईन वर्कर्स, जेष्ठ नागरीक व त्यांनतर सर्वसामान्य नागरीकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण कार्यक्रम राबवतांना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करणे, मोहिमेदरम्यान केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीसाठी फिडबॅक मिळवून त्यात योग्य ते बदल करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात आला.
याबाबत आयुक्त श्री. राजेश मोहिते म्हणाले की, लसीकरणाची पूर्वतयारी  म्हणून ड्राय-रन (रंगीम तालीम) घेण्यात आली आहे. ही रंगीत तालीम घेतांना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण आलेली नाही. लसीकरणाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याने प्रत्यक्ष लसीकरणाच्या दिवशी आरोग्य विभागामार्फत कोणत्या सोयी सुविधा पुरविण्यात येणार याची माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे जे काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे
याप्रसंगी मा.आयुक्त श्री. राजेश मोहिते, नगरसेवक राहुल घोटेकर, देवानंद वाढई, रवी आसवानी, छबूताई वैरागडे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. अश्विनी येडे व इतर वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here