चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी!

चंद्रपूर, 8 जानेवारी : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांनी आपला पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सध्या त्यांच्याजवळ या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सुबोधकुमार जयस्वाल यांच्या जागी हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. हेमंत नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून दिल्लीसह महाराष्ट्रातील अनेक राज्यात सेवा बजावली आहे.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपुरचे असून येथील भद्रावती जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केलं.
1987 बॅचच्या महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्यावर पोलीस महासंचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यूपीएससीच्या नियमांनुसार क्लिअरन्स मिळेपर्यंत अतिरिक्त जबाबदारी असेल. सुबोध जयस्वाल यांना सीआयएसएफचे नवीन डीजी बनल्यानंतर आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांना महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. हेमंत नगराळे हे सध्या कायदेशीर व तांत्रिक विभागाचे डीजीपी आहेत.

नक्षलवाद्यांपासून ते दहशतवाद्यांविरूद्ध लढले

आयपीएस झाल्यानंतर त्यांच्यावर पहिली मोठी जबाबदारी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यात देण्यात आली. तेथे त्यांच्यावर ASP ची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1992 ते 1994 या काळात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात डीसीपीचा कार्यभार सांभाळला आणि 1992 ते 1993 च्या दंगली दरम्यान सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवली. 1994 ते 1996 दरम्यान रत्नागिरीचे एसपी म्हणून दाभोल पॉवर कॉर्पोरेशनशी संबंधित जमीन अधिग्रहण प्रकरणही त्यांनी योग्य पद्धतीने सोडवलं. 1996 ते 1998 या काळात सीआयडी क्राइमचे एसपी म्हणून राज्यभर पसरलेल्या MPSC पेपर लीक घोटाळ्याचा त्यांनी मूळापर्यंत तपास केला. या पदावर असताना त्यांनी अनेक क्राईम केसेस सोडवल्या आणि पीडितांना न्याय दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here