
चंद्रपूर:बल्लारपूर नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणूकीत बांधकाम समितीच्या सभापतीपदी सौ. मिना चौधरी,स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी श्री.येलय्या दासरफ,शिक्षण सभापतीपदी सौ.सारिका सतिश कनकम, नियोजन सभापतीपदी श्री.अरूण वाघमारे, पाणीपुरवठा सभापतीपदी श्री.कमलेशप्रसाद शुक्ला,महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी श्रीमती.साखरा बेगम नबी अहमद यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती सदस्यपदी श्रीमती.जयश्री मोहुर्ले, श्रीमती.पुनम निरांजने, यांची निवड करण्यात आली आहे.
बल्लारपूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सभापतींचे माजी अर्थमंत्री आ.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री.हंसराजभैय्या अहीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री.चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष श्री.हरीश शर्मा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संध्या गुरनुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री.देवराव भोंगळे, भाजपा बल्लारपूरचे अध्यक्ष श्री.काशीनाथ सिंह,महामंत्री श्री.मनिष पांडे,श्री.शिवचंद द्विवेदी, सौ.रेणुका दुधे श्री.आशिष देवतळे,श्री.राजु दारी,श्री.राजु गुडेटी,श्री.रणंजय सिंग,श्री.महेंद्र ढोके, श्री.स्वामी रायबरम, सौ.आशा संगीडवार, सौ.सुवर्णा भटारकर,श्री.गणेश बहुरीया,श्री.राकेश यादव यांनी अभिनंदन केले आहे.