आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगाजी राचुरे शनिवारी चंद्रपूरात

चंद्रपूर,8 जानेवारी:आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे हे शनिवार दिनांक 9/1/21 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या उपस्थितीत स्थानिक तुकडोजी महाराज सभागृह, होंडा शोरूम समोर, नागपूर रोड येथे शनिवारी, सकाळी 11 वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे.
ग्रामपंचायत निवडणुका ,पंचायत समिती ,जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीचे उद्दिष्ट समोर ठेवून हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी अनेक कार्यकर्ते आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग, राज्य कमिटी सदस्य ॲड. पारोमिता गोस्वामी तसेच विदर्भ सचिव अविनाश श्रीराव उपस्थित राहणार आहे. मेळावा संपल्यानंतर 3:30 वाजता आम आदमी पार्टीची पुढील भूमिका याविषयी तुकडोजी सभागृह येथे पत्रकारांना संबोधित करणार आहे. करिता जास्तीत संख्येनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here