
चंद्रपूर : दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासकीय भवन, जिल्हा माहिती कार्यालय मीडिया सेंटर येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशन ऑफ स्माल एंड मिडीयम न्युजपेपर ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष डी. के. आरिकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव उपस्थित होते.यावेळी बोलतांना जाधव म्हणाले की, पत्ररकारितेच्या क्षेत्रात काम करतांना सर्व बाबींचा विचार करून, सोशल मीडिया आणि आजची पत्ररकारिता याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. जिल्हा माहिती कार्यालया मार्फत जी माहिती आवश्यक आहे ती पुरविण्याचे काम सदैव या कार्यालयातून केल्या जाईल. तसेच पत्रकारांच्या अडचणी संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड यांनी मागील 5 वर्षापासून संपादक आणि मालक यांना वृतपत्र चालवण्या करीता होत असलेली अडचण यावर व सोबतच आरएनआई ई-एनुअल रिपोर्ट फाइलिंग, महाराष्ट्र शासन जाहिरात धोरण आणि लघु वृतपत्रांना महाविकास आघाडीचे वर्ष पूर्तिची जाहिरातीपासून वंचित ठेवण्यात आले यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमला दिनेश एकवनकर ,प्रभाकर आवारी, रोशन वाकडे, अरुण वासलवार, विनोद बोदेले, नरेश निकुरे, विठ्ठल आवले, राजू बिटूरवार, मनोज पोतराजे,
संजय कन्नावार आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर आवारी यांनी केले तर प्रास्ताविक जितेंद्र जोगड व आभार दिनेश एकवनकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत संपादक, पत्रकार व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.