चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ‘पत्रकार दिन’ समारंभ कोरोनामुळे साधेपणाने होणार

चंद्रपूरः कोरोना संक्रमणामुळे सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक असल्यामुळे शासकीय निर्देशांचे सर्वांनी पालन करावे. गर्दीचे कार्यक्रम टाळावे. या गोष्टी लक्षात घेवून चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाने येत्या ६ जानेवारी २०२१ रोजी होणारा ‘पत्रकार दिन समारंभ’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंगळवार दि. २२ डिसेंबर २०२० रोजी कार्यकारिणीच्या सभेत घेतला. सर्व तालुका पत्रकार संघानी आप-आपल्या तालुकास्तरावर साधेपणाने गर्दी न करता आयोजित करावे असे सर्वांनूमते ठरविण्यात आले.

सभेच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर व्यास होते.चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने होणारे सर्व सत्कार समारंभ, पुरस्कार वितरण आदि कार्यक्रम कोरोनाचे सावट संपल्यावर करण्याचे ही सर्वांनूमते ठरविण्यात आले.

कार्यकारिणी सभेचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन सरचिटणीस सुनील तिवारी यांनी केले. या प्रसंगी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व परिषद प्रतिनिधी बबन बांगडे, डॉ.षडाकांत
कवठे,डॉ.उमाकांत धोटे, दिपक देशपांडे, बाबा बेग, मंगल जिवने, नामदेव वासेकर, रवि नागापूरे, सौ.शोभाताई जुनघरे आदि मान्यवर पदाधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here