डेपोत हिरवा बांबू उपलब्ध होणार 

चंद्रपूर : वनसंपदेने संपन्न चंद्रपूर जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बुरड समाज बांधव बांबू पासून साहित्य तयार करून उपजीविका भागवीत असतात. परंतु ओला बांबू उपलब्ध नसल्यामुळे बुरड समाजाच्या व्यवसायावर संकट कोसळले होते. आज वन विश्रामगृहात खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपसंचालक जी. गुरुप्रसाद यांच्याशी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. यामुळे हजारो बुरड समाज बांधवाना ओला बांबू उपलब्ध होणार आहे.

या बैठकीला प्रमोद देवगडे, रवी ठाकरे, आत्माराम तावाडे, अनंत ठाकरे, अनिल रायपुरे, बाळू सागोरे, पवन दुर्गे, वसंता दर्शनवार, संतोष दुपारे यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात वन विभागाला लागून असलेल्या गावात बांबू जंगलातून कापण्याकरिता बंदी आहे. त्यासोबतच मोहर्ली व इतर गावात ओला बांबू उपलब्ध नसल्यामुळे करायचं काय हा प्रश्न उपस्थित झाला होता. बुरड समाजावर व्यवसाय बंद असल्यामुळे करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला होता. एक शिष्टमंडळ खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर  यांना भेटून हा विषय सांगितलं. या विषयाचे गांभीर्य ओळखून धानोरकर दाम्पत्यांनी उपसंचालक बफर जी. गुरुप्रसाद यांच्याशी बैठक लावून त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक बांबू डेपो मध्ये ओला बांबू उपलब्ध करण्याचा सूचना दिल्या. त्यानंतर प्रत्येक बांबू उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here