
चंद्रपूर:घुग्घूस नगर परिषदेच्या निर्मीतीसाठी मुंबई येथे गतीशील हालचारी सुरु आहे. त्यामूळे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूका रद्द करण्यात यावा अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी आज मुबंई येथे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस मदान यांची भेट घेत केली आहे.
घुग्घूस नगर परिषदेची स्थापणा करण्यात यावी या करीता सर्व पक्षीय नेत्यांनी होऊ घातलेल्या घूग्घूस ग्रामपंचायतीच्या निवडणूकांवर बहिष्कार टाकला असल्याचेही यावेळी आ. जोरगेवार यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच या संदर्भातील फाईल अंतिम मंजूरीकरीता नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी आ. जोरगेवार यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस मदान यांना दिली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत प्रस्ताव प्राप्त होताच निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस मदान यांनी आ. किशोर जोरगेवार यांना दिले आहे.