
मुंबई:राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आली असली तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे. महाराष्ट्रात 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. तीन महिने कडक असलेले लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल करण्यात आले. मात्र संकटाचा धोका कायम असल्याने लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, मिशन बिगेन अगेन अंतर्गत सुरु झालेल्या सेवा-सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. इतर नियमांमध्येही काही बदल करण्यात आलेला नाही, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे
तसंच नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोरोना संसर्गात वाढ होऊ नये म्हणून नाईट कर्फ्यू सह विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे.