दोन बाधितांच्या मृत्यू सह 36 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 85 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 36 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 246 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 406 झाली आहे. सध्या 477 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 71 हजार 281 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 46 हजार 352 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये बापू नगर, दिग्रस येथील 66 वर्षीय महिला व बल्लारशा शहरातील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 363 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 334, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 17, यवतमाळ आठ, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 36 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 15, चंद्रपूर तालुका सात, बल्लारपुर दोन, भद्रावती एक, नागभिड एक, सिंदेवाही एक, मूल एक, सावली एक, राजूरा एक, चिमुर एक, वरोरा दोन व इतर ठिकाणच्या तीन रुग्णाचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here