अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन (आभासी) चंद्रपुरात उत्साहात संपन्न

चंद्रपूर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघठना आहे.युवा वर्गाला सक्षम करणे,सकारात्मक विचार रुजवने आणि समाजासाठी व देशहित कार्य करण्यास विद्यार्थी वर्गाला तयार करने,असे राष्ट्रहित कार्य विद्यार्थी परिषद गेल्या ७१ वर्षापासून अविरतपणे करीत आहे.गेल्या महिन्या भरापासून ६६वे राष्ट्रिय अधिवेशनची तयारी सम्पुर्ण भारतभर सुरु होती.राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे विद्यार्थी परिषदचा उत्साह,ऊर्जा प्रदान व लघु भारत दर्शन देणारे आणि अभाविपची पुढील दिशा व धोरण ठरवणारे अधिवेशन असते.या अधिवेशन मध्ये सम्पुर्ण भारतभर असलेले कार्यकर्ते एकत्रित येऊन हे अधिवेशन साजरे होते.पण यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभुमिवर रेशीमबाग,नागपुर येथे नियमांचे पालन करीत २५ डिसेंबर २०२० ला कमी संख्या चे ६६वे राष्ट्रिय अधिवेशन पार पडले.या कार्यक्रमाचे आभासी म्हणजे ऑनलाइन प्रक्षेपण सर्व भारतभर झाले.या माध्यमातून सर्व लघु भारत या अधिवेशन ला एकत्रित पणे अनेक स्थानावरुन जुळले होते.एक अनोखे अधिवेशन या वेळी बघायला मिळाले.असेच आभासी ६६वे राष्ट्रिय अधिवेशन चंद्रपुर जिल्ह्यात पण ठीक ठिकाणी पार पडले.चंद्रपुर महानगर तर्फे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपुर येथे आयोजित केले होते.सर्व नियंमाचे पालन करीत अतिशय उत्साही वातावरण मधे हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात दिप-प्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थिती व वक्ता म्हणुन प्रा.मंजिरी डबले,मुख्याध्यापिका लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, चंद्रपुर यांची होती.त्यांनी विद्यार्थी परिषद आणि शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल या विषयावर वक्तव्य करीत सर्वांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.योगिनी देगमवार अभाविप चंद्रपुर महानगर उपाध्यक्ष यांनी सादर केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्रा.पंकज काकडे अभाविप चंद्रपुर महानगर अध्यक्ष यांनी केले.तसेच सम्पुर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभम निंबाळकर अभाविप चंद्रपुर महानगर मंत्री यांनी केले.सम्पुर्ण कार्यक्रमाचे नियंत्रण निशिकांत आष्टनकर नियंत्रक यांनी केले आणि कार्यक्रमाचे अतिशय सुंदर संचालन कु.अनुश्री काकडे यांनी केले.या सोबतच प्रामुख्याने रोहित खेडेकर,रिषिकेश बनकर,शैलेश दिंडेेवार,रक्षित महाजन,श्रेयस श्रीगडीवार,मयूर बोकडे,रोशनी नगपुरे,रोहिणी ठाकरे,रेणुका मारशेट्टीवार,नंदनी सोनटक्के,अंजली बैस,मृणाल रॉय,खेमराज भलवे,मंदार झाडे,रोहीत सोनुले,शुभम वाघाडे,हर्षल येरेवार,पियुष बनकर,केतन बोकारे,महेश कोलते असे अभाविप चंद्रपुर महानगर चे कार्यकर्ते उपस्थित होते.या आभासी अधिवेशन ला अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी व पुर्व कार्यकर्ता आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.सर्वांनी चंद्रपुर महानगर च्या उत्साही आयोजनला दाद देत पुढील वाटचलीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here