

चंद्रपूर,23 डिसेंबर;जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेटटीवार,खासदार सुरेश उर्फ बालू धानोरकर,काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन शहरातील इंदिरा नगर येथिल मनसेच्या शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. तिवारी यांनी या कार्यकर्त्यांचे दुपट्टा घालून पक्षात स्वागत केले. पक्ष प्रवेश करणाऱ्यामध्ये नीतेश कौरासे, हेमंत बाविस्कर, सुमेध वाघमारे, प्रवीण यश वडेट्टीवार, तुषार खैरे, आकाश खैरे, जुगल सोमलकर यांच्यासह अन्य युवकांचा समावेश आहे.या कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक एकता गुरले, प्रसन्ना शिरवार, प्रवीण पडवेकर, दुर्गेश कोडाम, मोहन डोंगरे, पप्पू सिद्दीकी, कुणाल चहारे आदि उपस्थित होते.