
मुंबई:महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात उद्या(22 डिसेंबर)पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महानरपालिका क्षेत्रात संचारबंदी केली जाणार आहे. २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालवाधीत ही संचारबंदी लागू असणार आहे. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.