रामाळा तलाव खोलीकरण-सौंदर्यीकरण करीता इको-प्रो ची मुक निदर्शने

चंद्रपूर: शहरातील एकमेव ऐतिहासिक गोंडकालीन मात्र आज प्रदुषीत झालेल्या रामाळा तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरणाच्या मागणीकरीता इको-प्रो च्या सदस्यांनी रामाला तलावाच्या काठावर एकत्रीत येत ‘मुक निदर्शने’ केलीत.
इको-प्रो संस्थेच्या पर्यावरण विभागतर्फे आज रामाळा तलाव काठावर तलावाचे खोलीकरण-सोंदर्यीकरणाच्या मागणी करीता संस्थेचे सदस्य व तलावात नियीमत पोहायला येणारे नागरीक व स्थानीकांनी या मुक निदर्शने मध्ये सहभाग घेत ऐतिहासीक रामाळा तलाव संवर्धनाची मागणी केली आहे.इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे व इको-प्रो पर्यावरण विभागाचे प्रमुख नितीन रामटेके यांच्या नेतृत्वात आज मुक निदर्शने करण्यात आली. यावेळी मुक निदर्शने मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनी हातात विवीध मागण्यांचे बॅनर फलक घेउन तलावाच्या काठावर उभे राहुन नागरीकांचे लक्ष वेधुन घेत होते.
यावेळी सहभागी सदस्य व चंद्रपूरकरांनी हातात विवीध मागण्यांचे फलक घेउन जवळपास दोन तास निदर्शने करण्यात आली. यात मुख्य फलकातुन वसंुधरा अभियान अंतर्गत रामाळा तलावाचे संवर्धन करा, रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करा, रामाळा तलावाचे खोलीकरण करा, तलाव सभोवतालचे किल्लाच्या भिंतीतील वृक्ष वेली काढुन सुरक्षीत करा, वेकोलीचे वाया जाणारे पाणी तलावात सोडा, तलावात येणारे नागरीकांचे सांडपाणी थांबवा, रामाळा तलावात येणारे मच्छीनाला वळती करा, जलनगरच्या बाजुने सुरक्षा भिंतीचे बांधकाम करा, रामाळा तलावाच्या उत्तरेकडे सांडपाणी शुध्दीकरण संयत्र उभारा, किल्ल्याच्या भिंतीचे बांधकाम करा, सेव रामाळा सेव चंद्रपूर, सेव रामाळा सेव इन्व्हारमेंट, सेव रामाळा सेव हेरीटेज आदी फलक हातात घेउन निदर्शने करण्यात आली.
या सर्व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने, आपला ऐतिहासिक वारसा संरक्षणाच्या दृष्टीने तसेच शहरातील अत्यंत महत्वाचे विस्तीर्ण असे जलस्त्रोत कायमस्वरूपी संवर्धन करण्याच्या दृष्टीने व्यापकपणे कार्य करण्याची गरज आहे. तसेच या रामाळा तलावाचे सोंदर्यीकरण करून पर्यटन दृष्टया विकसीत करण्याची इको-प्रोची मागणी आहे. त्यासंदर्भात लगेच पावले उचलुन सध्या योग्य वेळ असल्याने लगेच तलावाचे पाणी सोडुन तलाव लवकर सुकविण्यात आल्यास खोलीकरणाच्या कामास यंदा सुरूवात होऊ शकते. यासोबत तलावाचे सौदर्यीकरणास सुध्दा मोठी संधी निर्माण होऊ शकते अशी आशा इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केली आहे.

आज करण्यात आलेल्या मुक निदर्शने मध्ये चंद्रपूरकर रमेश बोथरा, अॅड रविंद्र वर्मा, मजहर अली, राखी बोराडे, अरूण गोवारदिपे, दत्ता सरोदे, अनिल अडगुरवार, सुरज गंुडावार तसेच इको-प्रो सदस्य जितेंद्र वाळके, सुधीर देव, सुनिल लिपटे, धर्मेेद्र लुनावात, सौरभ शेटे, राजु काहीलकर, अमोल उटटलवार, किनारा खोब्रागडे, सचिन धोतरे, राजेश व्यास, संजय सब्बनवार, सुनिल पाटील, अमित आवारी, अभय अमृतकर, प्रमोद मलीक, गौरव वाघाडे, आकाश घोडमारे आदी सहभागी झाले होते.
यापुर्वी सुध्दा रामाळा तलाव खोलीकरणाबाबत प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलेले आहे. यातुन खालील मुदयाकडे प्रशासनाचे लक्ष वेळोवेळी वेधण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहे.
1. शहरातील मुख्य मच्छीनाल्याच्या एक भाग जो झरपट नदीस मिळतो तो सरळ तलावात येतो.
2. यामुळे तलावातील या घाण पाण्यावर जगणारी अनेक जलीय वनस्पती वाढत असते.
3. सोबत तलावानजीक राहणाÚया नागरीकांना या पाण्याच्या दुर्गधी आणी आजांराचा सामना करावा लागतो. मागील हप्ताभरापासुन या दुर्गधीची तिव्रता अधिक झालेली दिसुन येते.
4. यावर ‘वाॅटर ट्रिटमेंट प्लाॅन्ट’ बसविण्याची गरज असतांना अदयापही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
5. स्थानीक नागरीकांचे सांडपाणी सुध्दा सरळ तलावात जात असते. वस्तीतील सांडपाणी वाहुन जाणारी व्यवस्था योग्य करण्याची गरज आहे.
6. लगतच्या रेल्वे मालधक्कावरून रासायनीक खते चढ-उतार होत असल्याने जमीनीवर पडणारे युरीया, सल्फेट सारखी खते पावसाच्या पाण्यासोबत वाहुन तलावात येत असतात.
7. तलावाच्या पच्छिम दिशेस अतिक्रमणाची समस्या कायम असुन त्या बाजुस संरक्षण भिंतीचे बांधकाम अदयापही झालेले नाही.
8. गेल्या शेकडो वर्षातील वाहुन आलेला गाळ, आणि लोकवस्ती झाल्यानंतर नाल्यातुन सांडपाणी सोबतचा नालीचा गाळ कधीच काढण्यात आलेला नाही.
9. सातत्याने दरवर्षी होणारे गणेश व दुर्गा मुर्ती विसर्जन यामुळे जमा होणारी माती याचा थर वाढतच चालला आहे.
10. खोलीकरणानंतर पावसाचे पाण्याने तलाव भरणे शक्य नसल्यास वेकोली चे सातत्याने भुगर्भातील फेकण्यात येत असलेले पाणी तलावाकडे वळविणे सहज शक्य आहे.
11. ‘स्वच्छ भारत अभियानास’ साथ म्हणुन ‘स्वच्छ चंद्रपूर-सुंदर चंद्रपूर’ करीता या तलावाचे खोलीकरण अगत्याचे झालेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here