कर्तव्‍यतत्‍पर, अजातशत्रु लोकप्रतिनिधी गमावला – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:ज्‍येष्‍ठ जिल्‍हा परिषद सदस्‍य गोदरू पाटील जुमनाके यांच्‍या निधनाने आदिवासी बांधवांच्‍या प्रश्‍नांसाठी लढणारा कर्तव्‍यतत्‍पर लोकप्रतिनिधी आपण गमावल्‍याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे ज्‍येष्‍ठ सदस्‍य गोदरू पाटील जुमनाके यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. गोंडी भाषा मानकीकरण समितीच्‍या माध्‍यमातुन त्‍यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे. गोंडी भाषा संवर्धनाच्‍या प्रक्रियेमध्‍ये त्‍यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जनतेच्‍या हाकेला तत्‍परतेने ओ देणारा लोकप्रतिनिधी म्‍हणून गोदरू पाटील जुमनाके यांनी विशेष लौकीक संपादन केला. राजकीय मतभेदाच्‍या भिंती बाजूला सारत सर्वसामान्‍य जनतेला मदत करणारा अजातशत्रु लोकप्रतिनिधी काळाच्‍या पडदयाआड गेला आहे. त्‍यांच्‍या कुटूंबियांना या दुःखातुन सावरण्‍याचे बळ परमेश्‍वर देवो व त्‍यांच्‍या पुण्‍यात्‍म्‍याला शांती प्रदान करो असेही आ. मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here