विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आ. किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा

चंद्रपूर,17 डिसेंबर:चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवस आज विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर, गुरुद्वारा, बुद्ध विहार, जमनजट्टी दर्गाह, आंद्रिय चर्च इत्यादि धार्मीक स्थळी भेट देत प्रार्थना करत दिवसाची सुरुवात केली.
दरवर्षी प्रमाणे यंदाही आ. किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमीत्य शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन येथील कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या युवा आघाडीच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. तर दुपारी १२ वाजता आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात २०२१ या नव्या वर्षाच्या दिनदर्शीकेच्या विमोचन कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते हा विमोचन सोहळा पार पडला. या प्रसंगी आ. किशोर जोरगेवार यांच्यासह, मनपा विरोधी पक्ष नेता डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सुर्यकांत खनके, माजी नगर सेवक बलराम डोडानी, अजय जयस्वाल, राजेश नायडू, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, राजू जोशी , युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, राशिद हुसेन, विश्वजीत शाहा, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या इतर कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर दुपारी १ वाजता यंग चांदा ब्रिगेडचे नरेंद्र मडावी यांच्या वतीने बाबूपेठ येथील जूनोना चौकात हळदी दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे साईराम मडावी यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्त्याची उपस्थिती होती. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी ३ वाजता यंग चांदा ब्रिगेडच्या संघटीका चंदा ईटनकर यांच्या वतीने तुकूम येथील हनुमान मंदिर येथे महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आ. किशोर जोरगेवार यांची प्रमूख उपस्थिती होती. तसेच यावेळी महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. सायंकाळी ६ वाजता यंग चांदा ब्रिगेडचे संघटक देवा कुंटा यांच्या वतीने लालपेठ येथे कोरोना योध्दांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योवेळी कोरोनाकाळात सेवा देणा-या कोरोना योध्दांचा आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. अशा विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आज आ. किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनाबाबत सर्व नियम या कार्यक्रमांमध्ये पाळण्यात आले हे या कार्यक्रमांचे वैशिष्ट ठरले.
सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या युवक आघाडी, महिला आघाडी, युवती आघाडी, कामगार संघटना, आदिं शाखांच्या पदाधिका-यांनी अटक परिश्रम केले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी केले प्लाझ्मा दान
आ. किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य आज प्लाझ्मा दान केले शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांच्यासह अनेकांनी प्लाझ्मा दान केले. यावेळी माजी आ. वामनराव चटप यांचीही उपस्थिती होती.
ऑगस्ट महिण्यात आ. किशोर जोरगेवार यांचा कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आला होता. त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १५ दिवसांच्या लढ्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. दरम्याण त्यांच्या वाढदिवसानिमीत्य आज जैन भवन जवळीत जनसंपर्क कार्यालयात प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. जोरगेवार यांनी स्वत: प्लाझ्मा दान करत कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी प्लाझ्मा दानसाठी कोरोनातून बरे झालेल्यांनी समोर येण्याचे आवाहण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here