वन्यप्राण्यांचे मांस विक्री करणाऱ्या सहा आरोपींवर गुन्हे दाखल

चंद्रपूर, दि. 17 डिसेंबर : वनपरिक्षेत्र अधिकारी, चिचपल्ली यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दि. 14 डिसेंबर 2020 रोजी सापळा रचून मुल तालुक्यातील केळझर येथे मोर गजानन कोसरे, यांचे घरासमोर तपासणी केली असता दोन व्यक्ती अवैध रित्या रानटी डुक्कराचे मासाचे विक्री करित असताना आढळुन आले. सदर व्यक्तींना ताब्यात घेवून चौकशी केली असता सदर प्रकरणामध्ये एकुण 6 आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले.
सदर प्रकरणी रानटी डुकराचे अंदाजे 10 किलो मास, विळा, कुहाड, छोटा भाला, मोबाईल व साईकल जप्त करण्यात आले. आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करुन प्रथम श्रेणी न्यायालय, मुल यांचे समक्ष हजर करण्यात आले असता त्यांना पुढील चौकशी करीता 28 डिसेंबर 2020 पर्यंत मॅजीस्टेट कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी चंद्रपूर वनविभागाच्या विभागीय वन अधिकारी सारिका जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस. एल. लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी मधुमती साबाडे, हे पुढील तपास करीत असल्याचे श्री. लखमावाड यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here