मनपा कर्मचाऱ्यांना स्वच्छता ॲपसंबंधी प्रशिक्षण  

चंद्रपूर 10 डिसेंबर – स्वच्छ सर्वेक्षण 2021 या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानात चंद्रपूर शहर महानगरपालिका झोन क. १ अ, झोन क्र. २ ब व झोन क्र. ३ क  येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे स्वच्छता अँपसंबंधी प्रशिक्षण शिबीर तसेच नागरीकांनाही ओला- सुका कचरा याची माहिती देण्यात आली.
मनपातर्फे ओडीएफ ++ व  कचरामुक्त शहर (GFC)  करिता विविध जनजागृती कार्यकम घेण्यात येत आहेत. सफाई कामगार, नाली सफाई कामगार, घंटागाडी कामगार व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षित करण्यात येत आहे. सकाळी ७ वाजता विविध झोनमधे घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात  स्वच्छता ॲप ॲक्टीवेशन करणे, त्याचा वापर करणे, नागरीकांकडुन येणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे, शहर स्वच्छता, कोविड -19 तसेच शहर निरोगी ठेवतांना स्वतःच्या आरोग्याबाबत कशी काळजी घावी, ओला सुका कचरा वेगळा करून घेणे, कचऱ्याचे प्रकार इत्यादीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
उपस्थित नागरीक, स्वच्छता निरिक्षक, सफाई कामगार व इतर यांनी शहराच्या स्वच्छतेबाबत आपली जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी स्वच्छता निरीक्षक श्री.उदय मैलारपवार, विवेक पोतनुरवार, प्रदीप मडावी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here