महाराष्ट्रात लागू होणार शक्ती कायदा

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती मागणी
चंद्रपूर:महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाने, शक्ती हा नवीन कायदा निर्माण केला असून त्यामुळे निर्भयासारखा गुन्हा राज्यात घडल्यास एक महिन्याच्या आत शिक्षा होणार आहे, याशिवाय समाजमाध्यमावर महिलांची बदनामी करणे, ऍसिड हल्ला, विनयभंग यासारखे गुन्हे अजामीनपात्र होणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात या कायद्या संबंधीच विधेयक गृहमंत्री अनिल देशमुख विधानसभेत मांडणार आहे. हे सारे खटले एका महिन्यात निकाली काढण्यात येणार असून या साठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तपास यंत्रणा व स्वतंत्र न्यायालये स्थापन करण्यात येणार आहे. हा कायदा अतिशय महत्वाचा असून आंध्रप्रदेश च्या धर्तीवर हा कायदा तयार करण्यात आला आहे. वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धोनोरकर यांनी सातत्याने हा प्रश्न विधिमंडळात लावून धरला होता. आंध्रप्रदेश च्या धर्तीवर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा यासाठी सर्वप्रथम मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनीच केली होती. त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा कायदा समजून घेण्यासाठी आंध्रप्रदेश चा दौरा केला. त्यानुसार आता महाराष्ट्रातही हा कायदा लागू होणार आहे, त्यामुळे सर्व स्तरातून आमदार प्रतिभा धानोरकर यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे. अल्पावधीत च आमदार धोनोरकर यांनी महिलांचे अनेक प्रश्न विधिमंडळात लावून धरल्याने महिलांच्या प्रश्नासंबंधी जागरूक आमदार म्हणून त्यांची लोकप्रियता वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here