मनपाच्या स्वच्छता अभियानास स्वयंसेवकांचे उत्तम सहकार्य

चंद्रपूर ६ डिसेंबर –  मागील चार वर्षापासून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम शहरात आयोजित करण्यात आले आहेत. स्वच्छतेविषयक उपक्रम राबवितांना त्यात लोकांचा सहभाग असणे आवश्यक असतो. नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळावा व विविध प्रभागांमधे स्वच्छतेवर आधारित विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबविता यावे याकरिता इच्छुक स्वयंसेवकांचे सहकार्य मनपातर्फे घेण्यात आले होते. या स्वच्छतादूतांना उपक्रमांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावयाची आहे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते.
यातील अनेक स्वच्छता दूतांनी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद दिला. स्वच्छतेबाबत त्यांनी सर्वप्रथम स्वतः मध्ये सकारात्मक परिवर्तन केले. “आधी केले,मग सांगितले” या म्हणीला सार्थक ठेवत या स्वच्छता दूतांनी कार्यक्रमाची अंमलबजावणी स्वतः यशस्वीपणे तर केलीच सोबतच घरी,सभोवतालच्या परिसरात व इतर ठिकाणीही हा उपक्रम राबविला व नागरीकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळण्यास मदत केली.
या स्वच्छतादूतामध्ये –
श्री श्याम हेडाऊ प्राध्यापक एस.पी.कॉलेज –  स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याकरिता नेहमीच मार्गदर्शपर काम करीत आहेत.
श्री श्रीराम पानोरकर समाजसेवक –  शहरात विविध ठिकाणी सौंदर्यीकरण करण्याकरिता झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे तसेच दिव्यांग बंधुभागिनींना नेहमी मदत करण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहे.
श्री कुणाल चन्ने वृक्षप्रेमी –  शहराला ग्रीन सिटी बनविण्याच्या ध्यासाने  प्रत्येकाच्या घरी स्वखर्चाने झाडे पुरविण्याचे काम मागील काही वर्षांपासून करीत आहेत
तसेच स्वतः घरोघरी जाऊन वृक्षारोपण करण्याचे कामही करीत आहे.
श्रीमती श्वेता मडावी – शहरात प्लॅस्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक जनजागृती मोहीम हाती घेऊन शहरात विविध ठिकाणी प्लास्टिक बंदी,प्लास्टिकचा पुनर्वापर,तसेच कंपोस्टिंग खत यासारख्या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करीत असून स्वतः मार्गदर्शन करीत आहेत.
श्री प्रतीक निंबाळकर –  घनकचऱ्याचे व्यवस्थापन यासारख्या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करीत असून कार्यशाळेत स्वतः मार्गदर्शन करीत आहेत.
श्री राहुल कोटकर – चंद्रपूर शहरातील काही प्रभागामध्ये घनकचरा व्यवस्थापन यावर कार्यशाळेचे आयोजन करणे तसेच प्लॅस्टिक रिसायकलिंग करून पेवर ,बेंच,ट्री गार्डस बनविण्याचे काम करीत आहेत,तसेच याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
श्रीमती सविता धोटे –  मागील काही वर्षांपासून कापडी बॅग्स वाटप व स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. तसेच प्लास्टिक रिसायकलिंग सिंगल प्लास्टिक बंदी या या विषयावर कार्यशाळा घेऊन वेळोवेळी लोकांना मार्गदर्शन करीत आहे
श्रीमती अर्चना म्यानलवार – चंद्रपूर शहरातील वाढते प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी स्वतः कापडी बॅग तयार करून लोकांमध्ये वाटप करणे तसेच या  बॅग्जचा जास्तीत जास्त लोकांना  वापर करता यावा यासाठी घरच्या घरी कापडी बॅग्स कशा तयार करावयाच्या याचे मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे.
श्री स्नेहल खापे – यांची स्वतःची नर्सरी असून त्यामध्ये चंद्रपूर शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या झाडांची नर्सरीमध्ये स्वतः लागवड करीत आहे व नर्सरी मधुन तयार होणाऱ्या अशा वृक्षांचे शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
डॉ.प्रेरणा कोलते अध्यक्ष आरोही फाऊंडेशन  – आरोही फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वछतेबद्दल जनजागृती करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी कार्यशाळेत मार्गदर्शन केले, स्वच्छता व आरोग्य यांचा सहसंबंध त्यांनी आपल्या मार्गदर्शनातुन त्यांनी लोकांना समजावुन देण्यास हातभार लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here