

नागपूर : तब्बल पाच दशकांहून अधिक काळ नागपूर पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या भाजपला यंदा महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीमुळे धक्का बसला आहे. यंदाच्या या निवडणुकीत काँग्रेसचे(महाविकास आघाडीचे) अभिजीत वंजारी यांनी भाजपचे उम्मेदवार महापौर संदीप जोशी यांचा दारुण पराभव केला आहे.
नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये 17व्या एलिमिनेशन फेरीनंतर कोटा पूर्ण केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री. अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. 17 व्या एलिमिनेशन फेरीनंतर अभिजित वंजारी यांना 61 हजार 701 तर भाजपचे संदीप जोशी यांना 42 हजार 791 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 60 हजार 747 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता.