नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक

तीसऱ्या फेरी अखेर पहिल्या पसंतीच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांची घोषणा

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये तीसऱ्या फेरीअखेर एकूण ८४ हजार मतांपैकी ७ हजार २२८ अवैध व ७६ हजार ७७२ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहाय मते पुढील प्रमाणे आहेत.
अभिजीत वंजारी ३५ हजार ५०९, संदीप जोशी २५ हजार ८९८, राजेंद्रकुमार चौधरी १४९, इंजीनियर राहुल वानखेडे २ हजार ३२३, ॲङ सुनिता पाटील ९५, अतुलकुमार खोब्रागडे ५ हजार ७५७, अमित मेश्राम ४२, प्रशांत डेकाटे ९९३, नितीन रोंघे ३१५,
नितेश कराळे ४ हजार ३१४, डॉ. प्रकाश रामटेके १०२, बबन तायवाडे ६२, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ३९, सी.ए. राजेंद्र भुतडा ९८७, प्रा.डॉ. विनोद राऊत १०४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ४८, शरद जीवतोडे २४, प्रा.संगीता बढे ६१ आणि इंजीनियर संजय नासरे यांना ४० मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत आहे.
चौथ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here