बी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर द्या 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारिद्रय रेषेखालील कुटुंब आहेत. यापूर्वी बी. पी. एल चा दाखल ग्रामपंचायत स्थरावर मिळत होता. परंतु आता मात्र तालुका स्तरावरील पंचायत समिती मधून मिळत आहे. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे पूर्वी प्रमाणे बी. पी. एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरातून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
दारिद्र्य रेषेखालील लोकांना उदर्निवाह हा त्यांच्या दैनंदिन रोजगारावर अवलंबून असतो. हातावर आणून पानावर खाणारा हा वर्ग आहे.बी. पी. एल चा दाखल मिळविण्याकरिता रोजगार बुडवून ग्रामीण भागातून तालुक्यातील पंचायत समिती येथे जावे लागते. पंचायत समिती येथे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्यास त्याला बी. पी. एल चा दाखला मिळविण्याकरिता वारंवार चकरा माराव्या लागतात. यामध्ये त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बी. पी. येत चा दाखल हा पंचायत समिती मार्फत न देता ग्रामपंचायत मार्फत दिल्यास बी. पी. एल चा धारकांना होणार त्रास बंद होईल.
त्यामुळे पूर्वी प्रमाणे बी. पी. एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरातून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here