व्याघ्र प्रकल्पात प्रवेशासाठी भूलथापांना बळी पडू नये

चंद्रपूर, दि. 2 डिसेंबर : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी www.mytadoba.org या अधिकृत संकेतस्थळावरच परवाना आरक्षित करण्यात यावा. पर्यटन आरक्षण करुन देण्यासाठी कोणत्याही ऐजंटची नियुक्ती केलेली नसून पर्यटकांनी भूलथापांना बळी पडून कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, असे आवाहन विभागीय वनअधिकारी एस.एस.भागवत यांनी केले आहे.

नुकतेच नवेगाव कोअर पर्यटन प्रवेशद्वारावर वनरक्षक टेकचंद रुपचंद सोनुले यांनी सचिन संतोष कोयचाडे नावाचे खाजगी व्यक्तीमार्फत पर्यटकांकडुन पैसे घेऊन प्रवेशद्वारावरुन अनाधिकृतपणे जिप्सी सोडत असल्याची कबुली दिली. संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता असा अवैध प्रकार यापूर्वी अनेकदा केला असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर पोलीस स्टेशन चिमूर येथे लेखी फिर्याद देण्यात आली व एफ आय आर  दाखल करण्यात आली. सदरहू कार्यवाही करण्यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश खोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव ) सतीश शेंडे व इतर वनकर्मचारी यांनी कामगिरी बजावली असल्याचे विभागीय वनअधिकारी भागवत यांनी कळविले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here