
चंद्रपूर : प्रत्येक क्षेत्रात युवतींनी आपली छाप सोडली आहे. मायनींग व तत्सम पदविका प्रवेशासाठी महिला उमेदवारांना संधी देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी महिला उमेदवारांना संधी देण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषदेच्या अखत्यारीत सर्व संस्थांना या शैक्षणिक सत्रापासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ७ सप्टेंबर २०२० रोजी परिपत्रक काढले आहे. यानिर्णयाचा लाखो युवतींना लाभ होणार आहे.
अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषदेच्या अखत्यारीत संस्थांमधील मायनींग पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थिनींना आजपर्यत प्रवेश दिला जात नव्हता. मात्र २०२०-२१ शैक्षणिक सत्रापासून मायनींग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थिनींना आता मायनींग अभियंता होण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक जरी केलेले आहे.
चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे. वेकोलीमुळे दरवर्षी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. मात्र मायनींग पदविकेसाठी विद्यार्थिनींना प्रवेश नसल्याने आमदार प्रतिभाताई धानोकर घ्या आग्रही होत्या. त्यांच्या प्रयत्नाने आता युवकांना या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.