
चंद्रपूर:जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे गुन्हेगार इसम ज्यांवर पोलीस विभागातर्फे वारंवार कार्यवाही करून सुध्दा ते आटोक्यात येत नाही आणि जे वांरवार टोळीने दुखापतीचे गुन्हे करीत असतात अशा एकुण ०६ आरोपी इसमांवर पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनात जिल्हयातुन हदद्पार करण्यासाठी कलम ५५ मुंबई पोलीस कायदा अन्वये आदेश पारीत करण्यात आले आहे.
यामध्ये पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील १) मंगेश दशरथ बावणे वय ३२ रा. श्रीराम वार्ड बल्लारशाह, २) राहुल उर्फ गोलु राजु बहुरीया वय २० रा. सुभाष वार्ड बल्लारशाह, ३) किशन देशराज सुर्यवंशी रा. तिलक वार्ड बल्लारशाह, ४) अनवर शेख अब्बास शेख रा. आंबेडकर वार्ड बल्लारशाह आणि इतर दोन असे एकुण ६ इसमांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ प्रमाणे पोलीस अधीक्षक श्री.अरविंद साळवे यांनी चंद्रपुर जिल्हयाच्या हददीतुन दोन वर्षाकरीता हदपार केले आहे.